कराचीत विषारी वायूमुळे १८ जणांचा मृत्यू | पुढारी

कराचीत विषारी वायूमुळे १८ जणांचा मृत्यू

कराची : पाकिस्तानातील कराची शहरातील फॅक्टरीतील विषारी वायूमुळे गेल्या १६ दिवसांत १८ जणांचा मृत्यू झाला असून मृतांमध्ये १५ मुलांचा समावेश आहे. कारखाना परिसरात १९ जानेवारी रोजी विषारी वायु बाहेर पडू लागला. त्यानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. विषारी वायुमुळे लोकांना ताप आणि श्वास घेण्यास अडचणी निर्माण झाल्या. त्यानंतर पाठोपाठ लोकांचा मृत्यू होऊ लागला.

Back to top button