Bomb blast : नायजेरियात मोठा बॉम्बस्फोट 50 हून अधिक जणांच्या मृत्यूची शक्यता | पुढारी

Bomb blast : नायजेरियात मोठा बॉम्बस्फोट 50 हून अधिक जणांच्या मृत्यूची शक्यता

पुढारी ऑनलाइन डेस्क : Bomb blast : नायजेरियाच्या उत्तर मध्य क्षेत्रात नसरवा आणि बेन्यू राज्यांच्या दरम्यान मंगळवारी रात्री मोठा बॉम्बस्फोट झाला. यामध्ये 50 हून अधिक गुराखी आणि अन्य जवळपास राहणारे लोक मारले गेल्याचा अंदाज आहे. तर अनेक लोक जखमी आहे. तेथील राज्य सरकारच्या अधिका-यांनी याची बुधवारी माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार, Bomb blast : नायजेरियाच्या मियाती अल्लाह कॅटल ब्रीडर्स असोसिएशनचे प्रवक्ते तसीउ सुलेमान यांनी सांगितले की, फुलानी जमातीचे गुराखी त्यांची पाळीव गुरे बेनू येथून नसरावा येथे हलवत होते. त्यावेळी तेथील अधिका-यांनी चराईविरोधी कायद्यांचे उल्लंघन केल्याबद्दल प्राणी जप्त केले होते. रॉयटर्सने दिलेल्या माहितीनुसार, सुलेमान यांनी सांगितले की या घटनेत किमान 54 लोक मरण पावले. तसेच अनेक लोक जखमी झाले आहेत.

Bomb blast : नसरावाचे राज्यपाल अब्दुल्लाही सुळे यांनी अद्याप या स्फोटातील मृतांच्या संख्येबद्दल काहीही सांगितलेले नाही किंवा स्फोटामागे कोणाचा हात असावा हे त्यांनी सांगितलेले नाही, परंतु या घटनेमुळे निर्माण झालेल्या तणावाची खात्री करण्यासाठी आपण सुरक्षा यंत्रणांसोबत बैठक घेत आहोत, अशी माहिती त्यांनी दिली.

हे ही वाचा

चिंचवडच्या जागेवर आता शिवसेनेचा दावा; महाविकास आघाडीत एकमत होणार की बिघाडी?

रोज ८ मिनिटे काम, अन वेतन ४० लाख रुपये; आयएएस अधिकाऱ्याच्या पत्राने खळबळ

Back to top button