रोज ८ मिनिटे काम, अन वेतन ४० लाख रुपये; आयएएस अधिकाऱ्याच्या पत्राने खळबळ | पुढारी

रोज ८ मिनिटे काम, अन वेतन ४० लाख रुपये; आयएएस अधिकाऱ्याच्या पत्राने खळबळ

नवी दिल्ली : ९ जानेवारी २०२३ पासून हरियाणाच्या अभिलेख विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी नियुक्ती मिळालेल्या अशोक खेमका (आयएएस) यांनी रोज फक्त ८ मिनिटांच्या कामासाठी वर्षाला ४० लाख रुपये पगार मला मिळत असल्याचे पत्र थेट मुख्यमंत्री खट्टर यांना लिहिले आहे.

विभागाच्या एकूण बजेटच्या १० टक्के माझ्या पगारावर खर्च होते. अधिकाऱ्याची योग्यता आणि बुद्धिमत्ता लक्षात घेऊन काम दिले पाहिजे अशी मागणीही या पत्रातून खेमका यांनी केली आहे. भ्रष्टाचाराच्या उच्चाटनासाठी मला दक्षता विभागाची जबाबदारी सेवेतील अखेरच्या काळात द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली आहे. ३. वर्षांच्या कारकिर्दीत खेमका यांची तब्बल ५५ वेळा बदली झाली आहे. ते २०२५ मध्ये सेवेतून निवृत्त होणार आहेत.

 

Back to top button