Blogger Mithilesh : मुंबईच्या मिथिलेशला बेलारूसकडून वधूही, वेतनही! | पुढारी

Blogger Mithilesh : मुंबईच्या मिथिलेशला बेलारूसकडून वधूही, वेतनही!

मिन्स्क; वृत्तसंस्था : मुंबईच्या मिथिलेशने बेलारूस या देशातील लिझा हिच्याशी लग्न केले. मिथिलेश-लिझा सध्या बेलारूसलाच आहेत आणि त्यांच्या घरी नुकताच एक नवा पाहुणाही आला आहे. बेलारूस हा देश किती दिलदार आहे बघा… मिथिलेशला लग्नासाठी एक सुंदर मुलगीही दिली आणि आता त्याला बाळ झाल्यानंतर 1 लाख 28 हजार रुपये रोख दिले. (Blogger Mithilesh)

पुन्हा पुढील 3 वर्षांपर्यंत त्याला दर महिन्याला 18 हजार रुपयेही बेलारूस सरकारकडून मिळणार आहेत. (Blogger Mithilesh)

मिथिलेश-लिझाचे बाळ आता 2 महिन्यांचे झाले आहे. जोडप्यांनी मुले जन्माला घालावी म्हणून (लोकसंख्यावाढीसाठी) बेलारूसने अनुदान योजना सुरू केलेली आहे, त्याचाच लाभ मिथिलेशला झाला आहे. मिथिलेशची लिझाशी पहिली भेट बेलारूसमध्येच एका बर्थडे पार्टीत झाली होती. एका दुभाष्याच्या मदतीने त्यांच्यात पहिला संवाद झाला होता, हे विशेष! नंतर 25 मार्चला दोघांनी लग्न केले. दोन्ही कुटुंबांच्या उपस्थितीत हा समारंभ झाला होता.

अधिक वाचा :

Back to top button