PM नेतन्याहूंविरोधात इस्रायलमधील जनता रस्‍त्‍यावर, जाणून घ्‍या ऐतिहासिक आंदोलनाविषयी... | पुढारी

PM नेतन्याहूंविरोधात इस्रायलमधील जनता रस्‍त्‍यावर, जाणून घ्‍या ऐतिहासिक आंदोलनाविषयी...

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : इस्रायलमध्‍ये एक लाखांहून अधिक नागरिक रस्‍त्‍यावर उतरले आहेत. पंतप्रधान नेतन्‍याहू यांच्‍या विरोध जनता एकवटली असून, यापूर्वी एवढे व्‍यापक आंदोलन देशात झालेले नाही. त्‍यामुळे इस्रायलच्‍या इतिहासातील सरकारविरोधातील हे सर्वात मोठे आंदोलन मानले जात आहे. ( Protest in the Israel ) जाणून घेवूया या आंदोलनाविषयी…

‘द टाइम्‍स ऑफ इस्रायल’ने दिलेल्‍या वृत्तानुसार, शनिवारी रात्री उशिरा सुमारे एक लाखांहून अधिक नागरिक पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांचा निषेध करण्‍यासाठी रस्‍त्‍यावर उतरली. पंतप्रधान नेतन्‍याहू यांनी देशातील न्‍याय व्‍यवस्‍थेत बदल केला आहे. या बदलामुळे देशातील लोकशाहीचा पायाच धोक्‍यात आला आहे. नवीन बदलामुळे देशातील न्‍यायालयाचे अधिकार कमी होणार आहेत. या निषेधार्थ शनिवारी रात्री तेल अवीव येथे एक लाखांहून अधिक नागरिक रस्‍त्‍यावर उतरले. न्‍याय व्‍यवस्‍थेतवर दीर्घकालीन परिणाम करणारा नवा कायदा रद्‍द करावा, अशी आग्रही मागणी त्‍यांनी केली.  ( Protest in the Israel )

तेल अवीवसह जेरुसलेम, हैफा, बेरशेबा, हर्झलियासह देशभरातील अनेक शहरांमध्ये हजारो लोकांनी रस्त्यावर मोर्चा काढला. तेल अवीव येथील निदर्शनात ८० हजारांहून अधिक नागरिकांनी भाग घेतला. शहरातील अनेक रस्‍त्‍यांवर रास्‍ता रोको आंदोलन केले. आंदोलनकर्त्यांना हटविण्‍यासाठी मोठा पोलीस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता.

Protest in the Israel : काहीतरी चुकीचे होत आहे

यावेळी जनतेला संबोधित करताना इस्रायलचे ख्‍यातनाम लेखक डेव्हिड ग्रॉसमन म्‍हणाले, “जगात  ज्यू लोकांना आपल्‍या घर वाटले, या हेतूनेच इस्रायलची स्थापना झाली; परंतु इस्रायलीमधील लोक त्यांच्याच भूमीत अनोळखी असल्यासारखे वाटत असतील तर काहीतरी चुकीचे होत आहे. आता उभे राहून ओरडण्याची वेळ आली आहे की, आपला आत्मा या देशात राहतो. आज काहीही झाले तरी आपण कोण आहोत आणि आपली मुले काय होतील हे ठरवणे आवश्‍यक आहे.”

लोकशाही नेहमीच हुकूमशाहीचा पराभव करते : माजी संरक्षण मंत्री

इस्रायलचे माजी संरक्षण मंत्री आणि प्रमुख विरोधी पक्ष नेते मोशे यालोन यांनी पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या सरकारचे वर्णन ‘गुन्हेगारांची हुकूमशाही’ असे केले आहे. पंतप्रधान सर्व न्यायाधीश, हुकूमशहा नियुक्त करतील. ज्या प्रकारे आम्ही सीरिया आणि इजिप्तला नष्ट होण्यापासून रोखले, त्याच प्रकारे आम्ही नेतन्याहूला इस्रायलचा नाश करण्यापासून रोखू. आपल्याला हे करावे लागेल कारण आपल्याला राज्य आणि त्याच्या भविष्याची काळजी आहे. लोकशाही नेहमीच हुकूमशाहीचा पराभव करेल, असा विश्वासही मोशे यालोन यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

 

 

 

Back to top button