कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची चीन करतो आहे थेट पावडर! | पुढारी

कोरोना रुग्णांच्या मृतदेहांची चीन करतो आहे थेट पावडर!

बीजिंग, वृत्तसंस्था : चीनमध्ये कोरोनामुळे दैनंदिन मृत्यूंचे प्रमाण वाढले आहे. अंत्यसंस्काराचा प्रश्नही यामुळे निर्माण झाला आहे. स्मशानभूमीवर मृतदेहांच्या रांगा कमी करण्यासाठी चीन सरकार आता आईसबरिअल तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. या तंत्राने अंत्यसंस्काराची सुरुवात चीनच्या वुहान शहरातून करण्यात आली आहे.

आईसबरिअल तंत्रज्ञानांतर्गत मृतदेह उणे 196 अंशांवर द्रवरूप नायट्रोजनमध्ये गोठवले जातात. त्यानंतर मृतदेहांचे पावडरमध्ये रुपांतर केले जाते. मृतदेहांवर अंत्यसंस्कारासाठी आईसबरिअल तंत्रज्ञानाचा वापर ही तशी काही नवी गोष्ट नाही. सन 2016 मध्येही एका स्वीडिश व आयरिश कंपनीने अशाच धाटणीचे एक नवे तंत्रज्ञान विकसित केले होते.

मृत शरीराचा नायनाट करण्यासाठी या प्रक्रियेत द्रवरूप नायट्रोजनचा वापर केला गेला होता. चीनमध्ये मृतदेहांवरील अंत्यसंस्कारासाठी आईसबरिअल तंत्रज्ञानाचा वापर होत असल्याची ताजी माहिती जेनिफर जेंग यांनी दिली आहे. एका सोशल मीडिया युजरने कोरोना काळातच याआधीही चीनकडून मृतदेहांच्या विल्हेवाटीसाठी ही तर्‍हा योजण्यात आली होती, असा दावा केला आहे.

70 टक्के रुग्णवाढ!

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार, चीनमध्ये कोरोना रुग्णांचा आकडा गत आठवड्याच्या तुलनेत चालू आठवड्यात 70 टक्क्यांनी वाढला आहे.

Back to top button