अमेरिकन सैन्याचा सोमालियात एअर स्टाईक, अल शबाबचे 30 सैनिक ठार | पुढारी

अमेरिकन सैन्याचा सोमालियात एअर स्टाईक, अल शबाबचे 30 सैनिक ठार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोमालियामध्ये सरकारी सैनिकांना मदत करणाऱ्या अमेरिकन हवाई हल्ल्यात सुमारे ३० इस्लामी अल-शबाब दहशतवादी ठार झाले आहेत, असे अमेरिकन सैन्याने म्हटले आहे. हा हल्ला शुक्रवारी (दि.२१)  सोमालियातीस  गलकाडच्या मध्य सोमाली शहराजवळ  झाला.

राजधानी मोगादिशूच्या ईशान्येस सुमारे 260 किमी (162 मैल) अंतरावर असलेल्या गालकाड शहराजवळ हा हल्ला  झाला. गेल्या काही दिवसांपासून सोमाली लष्कर आणि अल-शबाबच्या दहशतवाद्यांमध्ये शहरावर ताबा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू आहे.100 हून अधिक अतिरेक्यांनी लष्करावर हल्ला केला असताना तेव्हा अमेरिकन लष्कराने शुक्रवारी हवाई हल्ला केला. असे यूएस आफ्रिका कमांडने म्हटले आहे.

अल-शबाब 2006 पासून सोमालियाच्या केंद्र सरकारशी लढा देत आहे, ज्याचा उद्देश अतिरेकी इस्लामी शासन लादण्याचा आहे. यूएस आफ्रिका कमांडने गलकाडशी लढा दिलेल्या अहवालात म्हटले आहे की अल-शबाबची तीन वाहने नष्ट करण्यात आली आहेत आणि “कमांडने असेही म्हटले आहे की, कोणतेही नागरिक जखमी किंवा ठार झाले नाहीत”.

हेही वाचा

Back to top button