पाकिस्तानमध्ये सर्वसामान्‍यांवर उपासमारीची वेळ, गव्‍हाच्‍या पिठाचे दर गगनाला | पुढारी

पाकिस्तानमध्ये सर्वसामान्‍यांवर उपासमारीची वेळ, गव्‍हाच्‍या पिठाचे दर गगनाला

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पाकिस्‍तानमधील आर्थिक स्‍थिती दिवसोंदिवस हालाख्‍याची होत चालली आहे. आर्थिक कंबरडे मोडलेल्‍या या देशात वाढत्‍या महागाईमुळे सर्वसामान्‍यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शहरात १५ किलो गव्हाचे पोते 2,250 रुपयांना विकले जात होते. त्याचवेळी अनुदानित पिठाच्या किमती ज्यातून लोकांना दिलासा मिळत होता, मात्र आता याचेही दर गगनाला भिडले आहेत. अनुदानित २५ किलो पॅकेट पिठाची किंमत प्रति पॅकेट 3100 रुपये झाली आहे. ( Pakistan economic crisis )

‘ द एक्सप्रेस ट्रिब्यून’ने दिलेल्‍या वृत्तानुसार, पाकिस्‍तानमध्‍ये गव्हाची किंमत 5,000 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचल्याने, रावळपिंडीच्या खुल्या बाजारात पिठाचा दर 150 रुपये प्रति किलोपर्यंत पोहोचला आहे. पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील शहार शहरात 15 किलोची गव्हाची पोती 2,250 रुपयांना विकली जात आहे. त्याचवेळी अनुदानित पिठाच्या किमती ज्यातून लोकांना दिलासा मिळत होता, तेही गगनाला भिडू लागले आहे. अनुदानित 25 किलो पॅकेट पिठाची किंमत प्रति पॅकेट 3100 रुपये झाली आहे.

 पिठाचे पाकीट घेण्यासाठी सिंध प्रांतात हाणामारी, एकाचा मृत्यू

गव्‍हाच्‍या पिठाच्‍या किंमती गगनाला भिडल्‍याने पाकिस्‍तानमधील काही प्रांतात परिस्‍थिती बिक होत चालली आहे. सिंध प्रांतात अनुदानित पिठाचे पॅकेट मिळविण्याच्या प्रयत्नात झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्‍यू झाला. सिंध प्रांतातील मीरपूर खास येथे काही लोक पिठाची पाकिटे विक्रीसाठी घेवून आले. कमी दरात पिठाची पाकिटे देण्याची घोषणा ऐकून मोठ्या संख्येने लोक जमा झाले. यावेळी झालेल्‍या हाणामारीत एका नागरिकाचा मृत्‍यू झाला.

Pakistan economic crisis : पिठाचे दर आणखी वाढवण्‍याची बेकर्स असोसिएशनचा इशारा

द एक्सप्रेस ट्रिब्यूनच्या वृत्तानुसार, रावळपिंडीच्या बेकर्स असोसिएशनने म्हटले हे की, जर किमती नियंत्रणात न आल्यास असोसिएशनला पिठाचे दर पुन्हा 5 रुपयांनी वाढवण्यास भाग पाडले जाईल. गिरणी मालकांच्या म्हणण्यानुसार, अन्नधान्याचा तुटवडा आणि गव्हाची उच्च आधारभूत किंमत पंजाबमधील पिठाच्या किमती वाढण्यास कारणीभूत आहे. पीएफएमएचे माजी अध्यक्ष खलेक अर्शद यांनी म्‍हटलं आहे की, पंजाब प्रांतात 21,000-22,000 टन गहू खरेदी केला जातो. सिंध, खैबर-पख्तुनख्वा आणि बलुचिस्तानमध्ये सरकारी गहू वितरत होण्‍याचे प्रमाण खूपच कमी आहे. मागणीच्‍या तुलनेत बाजारात धान्‍य नाही त्‍यामुळे दरवाढ झाली आहे.

पाकिस्‍तानच्‍या सांख्‍यिकी विभागाने जारी केलेल्‍या आकडेवारीनुसार, देशात वार्षिक चलनवाढ ३०.६० टक्‍क्‍यांनी वाढली आहे. त्‍यामुळे निम्‍म मध्‍यमवर्गीयांना महागाईच्‍या झळा बसत आहे. कडधान्‍य, भाजपाला यांच्‍या किंमतींमध्‍ये मोठी वाढ झाली आहे. नागरिकांना मूलभूत गरजा भागवणेही जिकरीचे झाले आहे.

हेही वाचा :

 

 

Back to top button