अयोध्येतील राम मंदिर उडवू; ‘अल-कायदा’ची धमकी | पुढारी

अयोध्येतील राम मंदिर उडवू; ‘अल-कायदा’ची धमकी

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : अयोध्येत बांधकाम सुरू असलेले राम मंदिर उडवून देण्याची धमकी अल-कायदा या जहाल दहशतवादी संघटनेने आपल्या मुखपत्रातून दिली आहे. अल-कायदाने आपल्या ‘गझवा-ए-हिंद’ या नियतकालिकाच्या डिसेंबरमधील अंकात राम मंदिराच्या जागी भव्य मशीद उभारण्याचा इशारा दिला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याविरोधातही या अंकात आगपाखड करण्यात आली आहे. भारतीय मुस्लिमांना बाकी सारे सोडून ‘जिहाद’ पुकारावा, असे आवाहनही त्यातून करण्यात आले आहे. गुजरात दंगलीचाही उल्लेख त्यात आहे. 110 पानांचा हा अंक आहे. अल-कायदाच्या देशातील स्लीपर सेलचा मुद्दाही त्यामुळे उपस्थित झाला आहे.

मोदी-योगींविरोधात आगपाखड

पंतप्रधान मोदी व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गझवा-ए-हिंद व शरिया कायदा या बाबी भारतीय उपखंडात पाकिस्तानचा प्रपोगंडा असल्याचे वाटते; पण तसे ते नाही. धर्मनिरपेक्षता ही बाब मुस्लिमांसाठी नरकाहून वेगळी नाही. हिंदू-मुस्लिम बंधुभाव ही एक फसवणूक आहे, असेही या लेखात स्पष्ट करण्यात आले आहे.

Back to top button