LPG Gas : पाकिस्तानात चक्क गॅस विकला जातो प्लास्टिक पिशव्यांतून

LPG Gas : पाकिस्तानात चक्क गॅस विकला जातो प्लास्टिक पिशव्यांतून
Published on
Updated on

नवी दिल्ली, वृत्तसंस्था : LPG Gas : पाकिस्तानात स्वयंपाकाचा गॅस चक्क कामचलाऊ प्लास्टिक पिशव्यांतून विकला जात आहे. तो लहान इलेक्ट्रिक सक्शन पंपाच्या मदतीने स्वयंपाकघरात वापरला जातो.

LPG Gas : विशेष म्हणजे, सरकारने ही बाब बेकायदेशीर असल्याचे घोषित केले असले; तरीही पिशव्यांतून गॅस नेण्याचा प्रकार देशात सर्रास दिसतो. प्लास्टिक बॅगेत गॅस भरण्यासाठी आणि तो स्वयंपाकघरापर्यंत पोहोचवण्यास कॉम्प्रेसरची आवश्यकता असते. त्याऐवजी थेट प्लास्टिक पिशव्यांचाच वापर होत आहे. एका यूझरच्या मते, एक बॅग भरण्यासाठी एक तास लागतो.

LPG Gas : पुन्हा पुन्हा वापरता येतील अशा या पिशव्यांची किंमत आकारावर अवलंबून असते. या पिशव्या 500 ते 900 रुपयांपर्यंत सहजपणे मिळतात. या तुलनेत कॉम्प्रेसरची किंमत 1,500 ते 2,000 रुपयांपर्यंत आहे.

LPG Gas : पाकिस्तानी पत्रकार गुलाम अब्बास शाह यांनी ट्विटरवर यासंदर्भात एक व्हिडिओ शेअर करताना म्हटले की, देशात नैसर्गिक वायूचा पुरवठा जिल्ह्यातील येथील निवासी प्लास्टिक पिशव्यांमध्ये खरेदी करत आहेत. करक हा खैबर पख्तुनख्वा प्रांतातील कोहाट डिव्हिजनमधील एक जिल्हा आहे.

सोशल मीडियावर याबाबतचा व्हिडिओ ट्वीटर वरून व्हायरल होत आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news