Emeritus Benedict : माजी पोप बेनेडिक्‍ट यांचे निधन | पुढारी

Emeritus Benedict : माजी पोप बेनेडिक्‍ट यांचे निधन

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : माजी पोप बेनेडिक्‍ट (९५ ) यांचे आज निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. ‘व्‍हॅटिकन सिटी’कडून याबाबतची अधिकृत माहिती देण्यात आली आहे. बेनेडिक्‍ट यांनी ९ वर्षांपूर्वी प्रकृती बिघडल्‍यामुळे आपल्‍या पदाचा राजीनामा दिला होता. जर्मनीसोबतही त्यांनी आपले संबंध जपले होते. बेनेडिक्ट यांच्या निधनानंतर प्रवक्ते म्हणाले, बेनेडिक्ट XVI यांचे आज (दि.३१) सकाळी ९.३४ मिनीटांनी निधन झाले. मैटर एक्लेसिया मोनेस्ट्रीमध्ये त्यांनी अखेरचा श्वास घेतला. पुढील माहिती लवकरात लवकर देण्यात येईल. वेटिकल सिटीकडून सांगण्यात आले की, त्यांचे पार्थिव सोमवारी (दि.२) सेंट पीटर्स बेसिलिका येथे ठेवण्यात येईल. (Emeritus Benedict)

पोप बेनेडिक्‍ट यांनी २०१३ मध्‍ये आपल्‍या पदाचा राजीनामा दिला होता. ६०० वर्षांमध्‍ये प्रथमच पोप पदाचा राजीनामा दिल्‍याची घडना घडली होती. यापूर्वी १४१५ मध्‍ये पोप ग्रेगरी बारावी यांनी पोप पदाचा राजीनामा दिला होता. पोप बेनेडिक्‍ट यांचे सध्‍या वास्‍तव्‍य व्‍हॅटिकन सिटीमध्‍ये होते. पोपपद सोडल्यापासून ते आपला वेळ प्रार्थना आणि ध्यानात व्‍यतित करत असत. (Emeritus Benedict)

हेही वाचा :

Back to top button