तळीरामांनो जरा जपून! नाही तर नवीन वर्षात थेट…. ‘यूज अँड थ्रो’ पाईपने होणार तपासणी | पुढारी

तळीरामांनो जरा जपून! नाही तर नवीन वर्षात थेट.... 'यूज अँड थ्रो' पाईपने होणार तपासणी

पुढारी ऑनलाईन डेस्क : नव्या वर्षाची सुरुवात होण्यास आता अवघे काहीच तास शिल्लक राहिले आहेत. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी प्रत्येकाचे काही खास प्लॅन्स असतीलच. अनेकांचे मद्याच्या सोबतीने नवीन वर्षाचे स्वागत करण्याचे खास प्लॅन असतील. पण यावेळी मात्र जरा सावधान !  मद्यपान करून वाहन चालवण्याचा प्रयत्न केला तर नवीन वर्षाची सकाळ पोलिस कोठडीत होऊ शकते. कारण मद्यपान करून वाहन चालवणाऱ्याना रोखण्यासाठी पोलिसांनीही कंबर कसली आहे.

मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांची तपासणी ब्रीथ अॅनालायझर द्वारे तपासणी केली जाणार आहे. पण सध्या कोरोना परतीच्या पार्श्वभूमीवर ही तपासणी युझ अँड थ्रो पाईपने केली जाणार आहे. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीसाठी या वेळी वेगळा पाइप असणार आहे.

तर होणार इतका दंड :
मद्यपान करून वाहन चालवणाऱ्या चालकांना जवळपास १००० रूपयांचा दंड होण्याची शक्यता आहेच. पण याशिवाय वाहनही जप्त केलं जाण्याची शक्यता आहे.

इतका फौजफाटा तैनात :
पोलिसांकडून लष्कर परिसर मॉल्स, हॉटेल्स, बसस्थानक, रेल्वेस्थानक, धार्मिक स्थळे अशा गर्दीच्या व संवेदनशील ठिकाणी तपासणी करण्यात आली आहे. याबरोबरच पोलिस अभिलेखावरून गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात येत आहे. कोणत्याही प्रकारचा घातपात होणार नाही, महिलांची सुरक्षितता, नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पोलिस आयुक्त रितेश कुमार, पोलिस सह आयुक्त संदीप कर्णिक यांच्या मार्गदर्शनाखाली 31 डिसेंबर व नववर्षाच्या स्वागत बंदोबस्तावर विशेष लक्ष देण्यात आले आहे. त्यासाठी वेळोवेळी बैठका घेऊन संबंधित पोलिस ठाण्यांच्या अधिकारी, गुन्हे शाखेच्या पथकांना 31 डिसेंबर रोजी चोख बंदोबस्त ठेवण्याच्या सूचना पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी दिल्या आहेत.

Back to top button