Google layoff | गुगल १० हजार कर्मचार्‍यांना नारळ देणार?; सीईओ सुंदर पिचाई काय म्हणाले पाहा… | पुढारी

Google layoff | गुगल १० हजार कर्मचार्‍यांना नारळ देणार?; सीईओ सुंदर पिचाई काय म्हणाले पाहा...

पुढारी ऑनलाईन डेस्क : Google ची मुळ कंपनी अल्फाबेट इंक १० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकणार (Google layoff) असल्याचे वृत्त नुकतेच समोर आले होते. यावर आता गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी मोठा खुलासा केला आहे. संभाव्य नोकरकपातीबद्दल पिचाई यांनी, सध्याच्या आर्थिक वादळाच्या संकटात Google काही बदल करत असल्याचे म्हटले आहे. तसेच त्यांनी नोकरकपात करण्याची शक्यताही नाकारलेली नाही. दरम्यान, आर्थिक मंदीच्या पार्श्वभूमीवर टेक कंपन्या मोठ्या प्रमाणात नोकरकपात करत असल्याने बेरोजगारीची समस्या गंभीर बनली आहे.

बिझनेस इनसाइडरच्या रिपोर्टनुसार, गुगलचे सीईओ सुंदई पिचाई यांनी म्हटले की, “आम्ही काही महत्त्वाचे निर्णय घेण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यासाठी शिस्तबद्ध रहा, आपण जिथे काही करू शकतो त्याला प्राधान्य द्या, पुढे काय आहे याची चिंता न करता परिस्थिती चांगली करण्यासाठी आपण कोठे तयार होऊ शकतो हे तर्कसंगत करा. मला वाटते की आपण यावरच लक्ष केंद्रित केले पाहिजे आणि तेथे आपले सर्वोत्तम प्रयत्न केले पाहिजेत.”

गुगल नवीन रँकिंग आणि कामगिरी सुधारणा योजनेद्वारे १० हजार कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची योजना आखत आहे. द इन्फॉर्मेशनमधील एका रिपोर्टनुसार, बाजारातील प्रतिकूल परिस्थिती आणि खर्चात कपात करण्यासाठी गुगल नोकरकपातीवर गंभीरपणे विचार करत आहे. दरम्यान, Google ने कर्मचार्‍यांना काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू केली आहे की नाही अथवा नोकरकपात न करता सध्याच्या परिस्थितीचा सामना करण्याचा प्रयत्न करीत आहे हे अद्याप अनिश्चित आहे.

याआधीच्या रिपोर्टमध्ये असे नमूद करण्यात आले होते की Google मूळ कंपनी अल्फाबेटने त्यांच्या व्यवस्थापकांना कंपनीच्या व्यवसायावर कमीत कमी परिणाम करणारे ६ टक्के कर्मचारी निवडण्यास सांगितले होते. याकडे नोकरकपातीच्या आधाची प्रक्रिया म्हणून पाहिले जात आहे. यामुळे Google कर्मचार्‍यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. (Google layoff)

अमेझॉन, मेटा, ट्विटर, सेल्सफोर्स आणि अनेक कंपन्यांमध्ये सध्या नोकरकपात सुरु आहे. गेल्या दशकभरातील मूल्यमापनातील वाढीमुळे तंत्रज्ञान क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर कर्मचारी वर्गाची भरती झाली होती. पण आता नोकरकपात केली जात आहे.

हे ही वाचा :

Back to top button