World’s oldest tortoise: जगातील सर्वात वयोवृद्ध कासव @190, सेंट हेलेनात विविध कार्यक्रमाचे आयोजन | पुढारी

World's oldest tortoise: जगातील सर्वात वयोवृद्ध कासव @190, सेंट हेलेनात विविध कार्यक्रमाचे आयोजन

पुढारी ऑनलाईन: जोनाथान हे कासव पृथ्वीवरील सगळ्यात मोठे आणि वयोवृद्ध कासव (World’s oldest tortoise) असल्याची यापूर्वीच घोषणा करण्यात आली होती. या कासवाने आज १९० वर्षे पूर्ण केली. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्सने त्याला सर्वात मोठे आणि वयोवृद्ध  म्हणून मान्यता दिली आहे. या सर्वात वयोवृद्ध कासवाच्या (World’s oldest tortoise)  वाढदिवसानिमित्त अटलांटिकमधील सेंट हेलेना येथे अनेक कार्यक्रमांचे आयोजन  करण्यात आले आहे.

जोनाथन हे पृथ्वीवरील सर्वात वृद्ध कासव आहे. हे कासव इतिहासाचा साक्षीदार आहे. त्‍याचा जन्‍म  नेपोलियनच्या मृत्यूनंतर काही वर्षांनी झाला. हे कासव अधिकृतपणे पृथ्वीवरील सर्वात जुना जिवंत प्राणी असल्याचे मानले जाते. या कासवाचा जन्मदिवस (World’s oldest tortoise) आज दक्षिण अटलांटिकमधील सेंट हेलेना येथे साजरा होत आहे. जिथे 1821 मध्ये पराभू झालेल्या फ्रेंच सम्राटाचा मृत्यू झाला.

World’s oldest tortoise: प्लांटेशन हाऊस ‘जोनाथन’चे अधिकृत निवासस्थान

१९० वर्षीय जोनाथन या कासवाच्या जन्मासंदर्भात स्थानिक प्रशसानाकडे कोणत्याही प्रकारचे ठोस आणि अधिकृत दस्तऐवज नाहीत. स्थानिक पातळीवर या वयोवृद्ध कासवाचा जन्म १८३२ मध्य झाला असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्याचे वय हे यापेक्षाही जास्त असू शकते, असे देखील सांगितले जाते. जोनाथन हे सेंट हेलेनाच्या गव्हर्नरांचे अधिकृत निवासस्थान असलेल्या प्लांटेशन हाऊस येथे सध्या वास्तव्यास आहे. सध्या ते येथे आरामदायी जीवन जगत आहे. सोबतच डेव्हिड, एम्मा आणि फ्रेड अशी आणखी तीन वृद्ध कासवे देखील या जोनाथनसोबत राहतात. १८३८ मध्ये जोनाथनचे पहिले छायाचित्र काढण्यात आल्याचे सांगितले जाते.

जोनाथनच्या वाढदिवसाची जय्यत तयारी

सेंट हेलेना येथे जोनाथनच्या वाढदिवसानिमित्त विशेष टपाल तिकिटाच्या प्रकाशनासह आठवड्याच्या शेवटी अनेक कार्यक्रम आयोजित केले आहेत. रविवारी जोनाथनच्या आवडत्या पदार्थांपैकी केकसह त्याचा वाढदिवस साजरा केला जाणार आहे. 2017 मध्ये ‘एएफपी’ला दिलेल्या मुलाखतीत त्याच्या काळजीवाहकांच्या मते, जोनाथनला गाजर, सॅलाड, काकडी, सफरचंद आणि नाशपाती आवडतात.

हेही वाचा:

Back to top button