बिल गेट्स यांनी सुचवलेली ५ पुस्तके वाचा आणि जीवन समृद्ध करा Bill Gates recommends 5 books | पुढारी

बिल गेट्स यांनी सुचवलेली ५ पुस्तके वाचा आणि जीवन समृद्ध करा Bill Gates recommends 5 books

बिल गेट्स यांनी सुचवलेली ५ पुस्तके वाचा आणि जीवन समृद्ध करा

पुढारी ऑनलाईन : वाचाल तर वाचाल अशी आपल्याकडे एक म्हण आहे. जगातील अनेक लोक आपलं जीवन समृद्ध करण्यासाठी वाचनाचा आधार घेतात. उद्योगपती, राजकारणी, व्यावसायिक, खेळाडू, कलाक्षेत्रातील दिग्गजांनी वाचनाची आवड जोपासल्याचे अनेकदा दिसून येते. मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आणि जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असलेले बिट गेट्स यांचे नावही पुस्तक प्रेमी म्हणून घेतले जाते. गेट्स या वर्षी कोणती पुस्तके वाचली हे त्यांच्या ब्लॉगमधून मांडत असतात. लोकांना नव्या पुस्तकांची माहिती व्हावी आणि वाचनाची गोडी लागावी असा त्यांचा उद्देश असतो. (Bill Gates recommends 5 books)

पाश्चाच्य देशात ख्रिसमसची सुटी असते. या सुटीच्या पार्श्वभूमीवर गेट्स यांनी त्यांना आतापर्यंत भावलेल्या ५ पुस्तकांची माहिती त्यांच्या गेट्स नोट्स या ब्लॉगमधून दिली आहे. ही पुस्तके आणि त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती खालील प्रमाणे आहे.

१. स्ट्रेंजर इन अ स्ट्रेंज लँड (Stranger in a Strange land)

हे पुस्तक रॉबर्ट हिनलिन (Robert Heinlein) यांनी लिहिलेले आहे. गेट्स यांनी फार पूर्वी हे पुस्तक वाचले आहे. सायन्स फिक्शन प्रकारातील हे पुस्तक आहे. यात व्हॅलेंटाईन मिशेल स्मित या युवकाची गोष्ट आहे. हा युवक मंगळावरून पृथ्वीवर येतो आणि नव्या धर्माची स्थापना करतो, अशी ही कथा आहे.

२. सरेंड (Surrender)

हे पुस्तक बोनो यांचे आत्मचरित्र आहे. तुम्ही रॉकस्टारचे फॅन नसला तरी हे पुस्तक तुम्हाला वाचायला आवडेल, असे गेट्स म्हणतात.

३. टीम रायव्हल्स (Team Rivals)

हे पुस्तक डोरिस किर्नस गुडविन (Doris Kearns Goodwin) यांनी लिहिले आहे. अब्राहम लिंकन आणि त्यांचे राजकीय कसब यावर हे पुस्तक बेतलेले आहे. हे पुस्तक जरी इतिहासावर आधारित असले तर आताच्या परिस्थितीत समर्पक आहे, असे गेट्स सांगतात.

४. द इनर गेम्स ऑफ टेनिस (The Inner Game of Tennis)

या पुस्तकाचे लेखक रॉबर्ट गालवे (Robert Gallwey) आहेत. टेनिसवर प्रेम करणाऱ्यांसाठी आणि इतर सर्वांसाठीच हे पुस्तक उपयुक्त आहे, असे गेट्स यांनी म्हटले आहे. या पुस्तकात शारीरिक तंदरुस्तीच्या बरोबरच मानसिक स्वास्थ्य किती आवश्यक आहे, याची मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे.

५. मेंडेलिज ड्रिम (Mendeleyev’s Dream)

या पुस्तकाचे लेखक पॉल स्ट्रॅदर्न (Paul Strathern) आहेत. मेंडेलिजची सारणी, त्याचा इतिहास याची चित्तथरारक मांडणी या पुस्तकात करण्यात आली आहे.

हेही वाचा

Back to top button