वॉरेन बफेट यांचा गेट्स फाऊंडेशनच्या ट्रस्टी पदाचा राजीनामा, ३० हजार कोटींचे शेअर केले दान | पुढारी

वॉरेन बफेट यांचा गेट्स फाऊंडेशनच्या ट्रस्टी पदाचा राजीनामा, ३० हजार कोटींचे शेअर केले दान

नवी दिल्ली ; पुढारी ऑनलाईन : जगातील श्रीमंत व्यक्तींपैकी एक असणारे वॉरेन बफेट यांनी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशनच्या ट्रस्टी पदाचा राजीनामा दिला आहे. बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी घटस्फोट घेतल्यापासून ट्रस्टला काही समस्यांना सामोरे जावं लागत आहे. ९० वर्षांचे बफेट यांनी बुधवारी राजीनामा दिल्याचे सांगितले. तसेच त्यांनी बर्कशायर हॅथवेचे ४.१ अब्ज डॉलरचे (सुमारे ३० हजार कोटी) शेअर दान करण्याची घोषणा केली आहे.

अधिक वाचा : सुपर व्हॅक्सिन सर्व व्हेरियंटवर प्रभावी

बफेट म्हणाले, फाउंडेशनबाबत असलेल्या निश्चित ध्येयापासून काहीतरी वेगळे होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. बफेट यांनी मागच्या १५ वर्षात २७ अब्ज डॉलरपेक्षाही अधिक रक्कम त्यांनी ट्रस्टला दिली आहे.

अधिक वाचा : ओबीसी नेते आक्रमक, पोटनिवडणूक स्थगितीसाठी राज्य सरकारचे निवडणूक आयोगाला पत्र

गेट्स फाउंडेशनच्या तीन सदस्यीय समितीत बफेट यांचा सहभाग होता. बफेट यांच्यासह बिल आणि मेलिंडा यांचा या समितीत समावेश आहे. मागच्या महिन्यात बिल आणि मेलिंडा गेट्स यांनी २७ वर्षांच्या वैवाहिक जीवनानंतर वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. बफेट आणि बिल गेट्स हे मागच्या कित्येक वर्षांपासून मित्र आहेत. 

अधिक वाचा : एसटी कर्मचार्‍यांचे पगार अखेर प्रवासी तिकिटांच्या पैशातून देणार

दरम्यान, बिल आणि मेलिंडा यांनी वैवाहिक जीवनातून वेगळे होताना म्हटले होते की आम्ही वेगळे होत असलो तरी गेट्स फाउंडेशनचे काम कायम करत राहणार आहे. आम्ही जीवनाच्या नवीन वळणावर जात असल्याचेही बिल गेट्स यांनी सांगितले होते.

Back to top button