Earthquake : लडाखमध्ये 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप | पुढारी

Earthquake : लडाखमध्ये 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप

पुढारी ऑनलाइन डेस्क : Earthquake लडाखमध्ये आज (दि.19) सकाळी 9.30 वाजता 4.3 रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. हा भूकंप कारगिल, लडाखपासून 64 किमी WNW या ठिकाणी झाला. भूकंपाची खोली जमिनीच्या खाली 10 किमी होती, नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी यांनी ट्विट करून याची माहिती दिली. त्यानंतर एएनआयने ट्विट करून याची माहिती दिली. या भूकंपात जीवितहानी झाली आहे का याचे माहिती अद्याप हातील आलेली नाही.

लेह लडाखमध्ये आज सलग दुस-या दिवशी भूकंपाचे धक्के जाणवले आहे. काल रात्री साडेआठच्या सुमारास देखिल लेह लडाखमध्ये 4.0 रिश्टर स्केलचे भूकंपाचे धक्के बसले.  काल अरुणाचल प्रदेश येथे सायंकाळी साडेसहाच्या सुमारास दिबांग व्हॅलीमध्ये 4.4 रिश्टर स्केलचा भूकंप झाला होता.

गेल्या 4 दिवसात आतापर्यंत मेघालय, अरुणाचल प्रदेश, लेह लडाख या भागात मिळून तब्बल 5 वेळा भूकंपाचे धक्के बसले आहेत. तर शेजारील म्यानमार आणि अफगाणिस्तानमध्ये सात वेळा भूकंप झाला आहे. यामध्ये अफगाणिस्तानात दोन वेळा भूकंपाचे धक्के जाणवले. तर म्यानमारमध्ये 4 वेळा भूकंप झाला आहे. या सर्व भूकंपांची माहिती Bhookamp या App वर देण्यात आली आहे.

 

हे ही वाचा

Earthquake in india : ईशान्येकडील राज्यांमध्‍ये सौम्य भूकंपाचे धक्के

 

Back to top button