Walt Disney : ट्विटर, मेटा, अॅमेझॉनच्या रांगेत वॉल्ट डिस्नेही कर्माचारी कपातीच्या मार्गावर | पुढारी

Walt Disney : ट्विटर, मेटा, अॅमेझॉनच्या रांगेत वॉल्ट डिस्नेही कर्माचारी कपातीच्या मार्गावर

पुढारी ऑनलाइन डेस्क : Walt Disney : ट्विटर, मेटा, अॅमेझॉन या सारख्या मोठ्या कंपन्यांनी कर्मचारी कपात केल्यानंतर आता आणखी एक धक्का बसणार आहे. दर्जेदार कार्टून बनवून बालकांचे मनोरंजन करणारी जगातील सगळ्यात मोठ्या कंपनींपैकी एक डिस्ने कंपनी देखिल आता कर्मचारी कपातीच्या मार्गावर आहे. हिवाळी सुट्टीनंतर डिस्ने कंपनी कर्मचा-यांची कपात करणार आहे. वॉलस्ट्रीट र्जनलने याचा अहवाल प्रकाशित केला आहे.

Walt Disney : वॉल स्ट्रीट जनरलने म्हटले आहे. की वॉल्ट डिस्ने कंपनीसाठी ही तिमाही निराशाजनक ठरली आहे. त्यामुळे कंपनी हिवाळी सुट्टीच्या आधी नोक-या गोठवण्याचा आणि काही नोक-या कमी करण्याचा विचार करत आहे.

डिस्नेचे सीईओ बॉब चापेक यांनी कर्मचा-यांना पाठवलेल्या मेमोमध्ये डिस्नेचे सीईओ बॉब चापेक यांनी म्हटले आहे की कंपनी काही कर्मचारी कपातीसह खर्च बचत उपायांना प्राधान्य देऊन पुढे जाईल.

त्यांनी कर्मचा-यांना पुढे लिहिले आहे की, “मला पूर्ण जाणीव आहे की तुमच्यापैकी अनेकांसाठी आणि तुमच्या संघांसाठी ही एक कठीण प्रक्रिया असेल,” चापेक यांनी लिहिले. “आम्हाला कठोर आणि अस्वस्थ निर्णय घ्यावे लागतील. पण नेतृत्वाला तेच हवे आहे आणि या महत्त्वाच्या काळात पाऊल उचलल्याबद्दल मी तुमचे आगाऊ आभारी आहे.”

Walt Disney : “आम्ही या मूल्यमापन प्रक्रियेद्वारे कार्य करत असताना, आम्ही बचत शोधण्यासाठी ऑपरेशन्स आणि श्रमांच्या प्रत्येक मार्गावर लक्ष ठेवू आणि या पुनरावलोकनाचा भाग म्हणून आम्ही काही कर्मचारी कपातीची अपेक्षा करतो,” असे चापेक यांनी शुक्रवारी पाठवलेल्या मेमोमध्ये म्हटले आहे.

याशिवाय त्यांनी कर्मचा-यांच्या मेमोमध्ये असेही म्हटले आहे की, कंपनी अतिरिक्त कर्मचा-यांच्या नियुक्तिवर मर्यादा घालेल आणि आम्ही टार्गेट हायरिंग फ्रीजद्वारे हेड अकांउंट्स मर्यादित करित आहोत. तर अन्य सगळ्या भूमिका होल्डवर आहेत. एचआर टीमकडे याबद्दल खोलवर तपशील दिले आहेत.

Walt Disney : चापेकने मेमोमध्ये असेही सूचित केले आहे की डिस्ने कंपनीच्या खर्चात आणखी कमी करण्यासाठी “कॉस्ट स्ट्रक्चर टास्कफोर्स” स्थापन करेल. याचे नेतृत्व सीईओ, मुख्य वित्तीय अधिकारी क्रिस्टीन मॅककार्थी आणि जनरल काउंसिल होरासिओ गुटेरेझ करतील. मॅककार्थीने पैसे वाचवण्यासाठी अल्पकालीन आणि दीर्घकालीन दोन्ही बदल करण्याचा डिस्नेचा इरादा जाहीर केल्यानंतर काही दिवसांनी मेमो आला आहे.

Walt Disney : महागाईमुळे लोकांचे खिसे कापले गेले आहे. त्यामुळे डिस्नेला मोठ्या प्रमाणात तोटा सहन करावा लागला आहे. कंपनीचा ऑपरेटिंग तोटा सतत वाढत आहे. डिस्नेने या चौथ्या तिमाहित सुमारे दीड अब्ज रुपयांचे नुकसान नोंदवले आहे. कंपनीचे शेअर्स बुधवारी 52 आठवड्यांच्या नीचांकी पातळीवर आले. सोमवारी शेअर्स 101 डॉलरवून थेट 87 डॉलर इतके खाली आले. तर शुक्रवारी संध्याकाळपर्यंत ते 95 डॉलर पर्यंत वर आले आहेत. याशिवाय वॉल्ट डिस्ने काही विवादांमध्ये देखिल अडकली आहे.

हे ही वाचा :

Twitter Lays Off In India : भारतात ट्विटरमध्ये डझनभरच कर्मचारी; एलॉन मस्क यांनी खाल्ला ९० टक्के रोजगार

‘मायक्रोसॉफ्ट’ सोडून ‘मेटा’त गेली, दोनच दिवसांत नोकरी गेली; भारतीय कर्मचाऱ्यांची अवस्था बिकट

आर्थिक मंदीची चाहूल! मेटा, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट नंतर आता Amazon ने ३,७०० कर्मचाऱ्यांना दिला नारळ?

Back to top button