अबब! तुर्कीच्या एका धार्मिक नेत्याला लैंगिक अत्याचार प्रकरणी सुनावली 8,658 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा | पुढारी

अबब! तुर्कीच्या एका धार्मिक नेत्याला लैंगिक अत्याचार प्रकरणी सुनावली 8,658 वर्षाची तुरुंगवासाची शिक्षा

पुढारी ऑनलाइन डेस्क : तुर्कीच्या एका धार्मिक नेत्याला लैंगिक अत्याचारप्रकरणी तुर्कीच्या न्यायालयाने चक्क 8 हजार 658 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावली आहे. त्याच्यावर महिलांसोबत अभद्रता करण्याचा तसेच त्यांच्यावर अत्याचार करण्याचा आरोप होता. अदनान ओकतर असे या स्वतःला धार्मिक नेता म्हणवणा-या आरोपीचे नाव आहे.

एनडीटीव्हीने याचे वृत्त दिले आहे. अदनान ओकतार हा 66 वर्षांचा असून तो तुर्कीमध्ये एक धार्मिक गुरू आहे. अदनान ओकतार एक टीवी शो होस्ट करतो. या शोमध्ये अनेक मुली असतात. ज्या खूप भडक मेकअप आणि कमी कपड्यांमध्ये असतात. अदनान या मुलींना Kitten असे म्हणतो.

ओकतार आपले जीवन खूपच शानशौकतमध्ये जगतो. त्यावर यापूर्वी देखिल अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्या प्रकरणी 1075 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली होती.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अदनानवर राजनैतिक आणि सैन्य जासूसीचे देखिल आरोप आहेत. मीडियाच्या रिपोर्टनुसार अदनान इस्तंबुलमध्ये राहतो. इथे तो एक टीवी शो करतो आणि आपल्या विचारांना लोकांपर्यंत पोहोचवतो. याशिवाय अदनानची लाइफस्टाइल वेगळी आहे. तो नेहमीच पार्टी करत असतो आणि देश विदेशातील प्रसिद्ध व्यक्तिंना आपल्या शोमध्ये आमंत्रित करतो.

हे ही वाचा :

लवंगी मिरची : प्लास्टिक रुपया म्हणजे काय हो भाऊसाहेब..?

Direct Tax Revenue : चालू आर्थिक वर्षात प्रत्यक्ष कराच्या महसुलामध्ये उद्दिष्टापेक्षा 25 टक्के वाढ?

Back to top button