पोलंडवर डागले गेलेले क्षेपणास्‍त्र युक्रेनचे : प्राथमिक चौकशीतील माहिती | पुढारी

पोलंडवर डागले गेलेले क्षेपणास्‍त्र युक्रेनचे : प्राथमिक चौकशीतील माहिती

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : पोलंडवर डागलेले गेलेले क्षेपणास्‍त्र हे युक्रेनचे असल्‍याचे प्राथमिक चौकशी स्‍पष्‍ट झाल्‍याची माहिती अमेरिकेच्‍या अधिकार्‍यांनी दिली आहे. हे क्षेपणास्‍त्र रशियाने डागले असल्‍याचा आरोप होत होता. आता प्राथमिक चौकशीमुळे आता या वादावर पडदा पडला आहे.

यासंदर्भा रॉयटर्सने दिलेल्‍या वृत्तानुसार, पोलंडवर रशियाने क्षेपणास्त्र डागल्‍याचा आरोप करण्‍यात आला होता. दरम्‍यान यासंदर्भात अमेरिकेचे अध्यक्ष ज्‍यो बायडेन यांनी म्‍हटले आहे की, “हे क्षेपणास्‍त्र युक्रेनचे विमानविरोधी क्षेपणास्त्र असल्याचे संकेत मिळत आहेत.”

मंगळवारी रशियाच्‍या लष्‍कराने युक्रेनच्‍या भूभागावर प्रचंड गोळीबार केला होता. यावेळी युक्रेनच्या सीमेला लागून असलेल्या पोलंडच्‍या लुबेलस्‍की प्रांतात क्षेपणास्‍त्र पडले. यामध्‍ये पोलंडच्‍या दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. हे क्षेपणास्‍त्र रशियाचे असल्‍याचा दावा केला गेला. मात्र रशियाच्‍या संरक्षण मंत्रालयाने हा दावा फेटाळाला होता. तसेच पोलंडच्‍या सीमेला लक्ष्‍य केलेले नाही, असे स्‍पष्‍ट केले होते.

क्षेपणास्‍त्र हल्‍ला झाल्‍यानंतर पोलंडचे अध्‍यक्ष आंद्रेज डुडा यांनी अमेरिकेचे अध्यक्ष ज्‍यो बायडेन आणि ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांच्‍याशी फोनवरुन चर्चा केली होती. आता पोलंडमध्‍ये डागलेले गेलेले क्षेपणास्‍त्र युक्रेनचे असल्‍याचे स्‍पष्‍ट झाल्‍याने रशियाचा दावा खरा ठरला आहे.

हेही वाचा : 

 

 

Back to top button