Twitter : 'या' दोघांचे स्वागत करत, मस्क म्हणाला त्यांना काढून टाकणे माझी 'घोडचूक'

पुढारी ऑनलाइन डेस्क : Twitter : ट्विटरचा नवीन मालक एलॉन मस्क यांनी ट्विटरचा ताबा घेतल्यानंतर अवघ्या दोनच आठवड्यात मोठी कर्मचारी कपात केली. सुरुवातीला त्यांनी ट्विटरचे पूर्वीचे सीईओ पराग अगरवाल यांना काढून टाकले नंतर त्यापाठोपाठ अनेक मोठमोठ्या पदावर असलेल्या व्यक्तिंना मस्क यांनी काढून टाकले. मात्र, काढून टाकलेल्या कर्मचा-यांपैकी दोन कर्मचा-यांना मस्कने पुन्हा घेतले. तसेच या दोघांना काढून टाकणे ही माझी घोडचूक होती असे म्हटले आहे.
Twitter : राहुल लिग्मा आणि डॅनियल जॉन्सन यांना पुन्हा नियुक्त करण्यात आले आहे. मस्कने नुकतेच ट्विटर प्लॅटफॉर्मवर दोघांसोबतचे एक छायाचित्र पोस्ट केले आहे. त्याला त्याने लिग्मा आणि जॉन्सनचे परत स्वागत आहे असे म्हटले आहे. एक गोष्ट नोंद घेण्यासारखी आहे. हे दोन्ही तेच कर्मचारी आहेत. ज्यांचे फोटो सॅन फ्रान्सिस्को, येथे ट्विटरच्या ऑफिसमधून त्यांच्या प्रत्येक वस्तूचा एक बॉक्स घेऊन निघून जाताना मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते.
काही वृत्तानुसार लिग्माने वेब 2.0 आणि FTX साठी काम केले मात्र या दोन्ही कंपन्यांनी आपले हजारो कर्मचारी काढून टाकले आहेत. तर दुस-या एका बातमीनुसार लिग्माने यापैकी कोणत्याही कंपनीत काम केलेले नाही. मस्कने कर्मचा-यांना कमी केल्याच्या निर्णयावर अनेकांनी टीका केली आहे. तसेच यामुळे मस्क मोठ्या प्रमाणात ट्रोल झाला होता. ट्विटरच्या काही कर्मचा-यांनी सांगतिले की, त्यांच्या वर्तनाने कंपनीच्या धोरणाचे उल्लंघन केले आहे असे ई मेलद्वारे कळवून त्यांना काढून टाकण्यात आले.
Twitter : दरम्यान लिग्मा आणि डॅनियलला परत घेतल्यानंतर मस्क ने स्वतः दोघांचा फोटो पोस्ट करत दोघांचे पुन्हा एकदा स्वागत आहे असे कॅप्शन दिले आहे. तसेच त्याने असेही म्हटले आहे, ”मी या प्रतिभावंतांना काढून टाकल्याबद्दल माफी मागू इच्छितो, त्यांना काढून टाकणे ही माझी मोठी चूक होती हे मला मान्य करावेच लागेल. त्यांच्या अफाट प्रतिभेचा इतरत्र खूप उपयोग होईल यात शंका नाही.”
Welcoming back Ligma & Johnson! pic.twitter.com/LEhXV95Njj
— Elon Musk (@elonmusk) November 15, 2022
हे ही वाचा :
Shraddha Walkar murder Case | श्रद्धा वालकर हत्या प्रकरण! रक्ताचे नमुने, हाडांची ‘डीएनए’ चाचणी होणार
Twitter : ट्विटर ब्लू टिक सबस्क्रिप्शन पुन्हा सुरू होणार? एलॉन मस्क म्हणाले….