G-20 Summit : भारत 21 व्या शतकात जगाचे आशास्थान : पंतप्रधान नरेंद्र मोदी | पुढारी

G-20 Summit : भारत 21 व्या शतकात जगाचे आशास्थान : पंतप्रधान नरेंद्र मोदी

बाली, वृत्तसंस्था : G-20 Summit : भारत हा 21 व्या शतकासाठी जगाच्या आशेचे केंद्र बनला असून 2014 पूर्वीचा आणि 2014 नंतरचा भारत यात जमीन अस्मानाचा फरक असल्याचे मत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केले.

जी-20 शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारतीय समुदायासमोर बोलताना मोदी यांनी भारताने गाठलेल्या यशोशिखराबाबत सर्वांना अवगत केले. मोदी यांचे आगमन होताच उपस्थितांनी ‘मोदी मोदी’च्या गगनभेदी घोषणा देत त्यांचे जंगी स्वागत केले. उपस्थित भारतीयांना संबोधित करताना ते म्हणाले की, इंडोनेशिया आणि भारत यांच्यात सांस्कृतिक समानता आहे. हजारो वर्षांपूर्वी झालेली ही सांस्कृतिक देवाणघेवाण आहे. भारताने संकटाच्या काळात इंडोनेशियाला कायमच मदतीचा हात दिला आहे. भारत कायमच इंडोनेशियाच्या पाठीशी आहे. दोन देश 90 नॉटीकल मैल दूर नसून 90 नॉटीकल मैल जवळ आहेत.

G-20 Summit : मोदी बायडेन भेट

अपूर्वा केम्पिन्स्की रिसॉर्टमध्ये पंतप्रधान मोदी आणि ज्यो बायडेन यांच्यात एक पूलसाईड बैठक झाली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी दोन्ही देशांतील संबंधांचा आढावा घेतला. तसेच भविष्यात महत्त्वपूर्ण ठरू शकतील अशा तंत्रज्ञान, अ‍ॅडव्हान्स कंप्युटिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता आदी क्षेत्रांत सहकार्य करण्याबाबत चर्चा झाली असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात स्पष्ट केले आहे.

या वेळी दोन नेत्यांनी जागतिक व विभागीय घटनांबाबत चर्चा केली व द्विपक्षीय संबंध द़ृढ करण्याबाबत अमेरिका देत असलेल्या पाठिंब्याबाबत त्यांचे आभार मानले.

G-20 Summit : बुधवारी 8 नेत्यांसोबत बैठका

पंतप्रधानांचा बुधवार अतिशय व्यस्त असणार आहे. बुधवारी ते ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनाक, इटलीच्या नवनिर्वाचित पंतप्रधान जॉर्जिया मेलॉन यांच्यासह ऑस्ट्रेलिया, स्पेन, सिंगापूर, फ्रान्स, इंडोनेशियाच्या प्रमुखांसोबत स्वतंत्र बैठकांत चर्चा करणार आहेत.

हे ही वाचा :

Mumbai : जैविक कचरा उचलणारी कंपनीच गोवर रोगाला कारणीभूत

FIFA WC 2022 : पुरुष फुटबॉलपटूंवर ‘या’ तीन महिला रेफरींचा अंकुश! फिफा वर्ल्ड कपमध्ये घडणार इतिहास

Back to top button