‘भारतीय खूप प्रतिभावान असतात’, पुतिन यांच्याकडून स्तुतिसुमनांचा वर्षाव | पुढारी

'भारतीय खूप प्रतिभावान असतात', पुतिन यांच्याकडून स्तुतिसुमनांचा वर्षाव

पुढारी ऑनलाइन डेस्क : भारतीय खूप प्रतिभाशाली असतात यात कोणताही संशय नाही कि भारतात खूप संभावना आहेत आणि विकासाबाबत इथे शानदार परिणाम प्राप्त होतील, अशा शब्दांत रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारतीयांवर स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. शुक्रवारी (दि.4) रशियाचा राष्ट्रीय एकता दिवस होता. त्यावेळी पुतिन यांनी अफ्रिकेतील उपनिवेशवाद, भारताची क्षमता आणि अद्वितीय सभ्यता आणि संस्कृती यांच्यावर भाष्य केले.

रॉयटर्स या न्यूज एजन्सीने पुतिन यांच्या मूळ रशियन भाषेतील भाषणाचा अनुवाद केला आहे.

पुतिन म्हणाले विकासाच्या बाबतीत भारताला शानदार परिणाम मिळतील यात अजिबात संशय नाही. तसेच जवळपास दीड अब्ज लोक ही भारताची ताकद आहे. भारताचे लोक आंतरिक विकासासाठी खूप प्रतिभाशाली आहे आणि प्रेरित आहे. त्यामुळे निश्चितच त्यांना चांगले परिणाम प्राप्त होतील.

पुतिन यांनी यापूर्वी देखिल भारत आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची स्तुती केली होती. 28 ऑक्टोबरला ते म्हणाले होते त्यांच्या देशाचे भारतासोबतचे नाते खूप खास आहे. दोन्ही राष्ट्रांनी नेहमीच एकमेकांचे समर्थन केले आहे. भविष्यात सुद्धा हे नाते असेच राहील. तसेच त्यांनी राष्ट्राच्या हितासाठी स्वतंत्र विदेश नीतीचा अवलंब केल्याबद्दल नरेंद्र मोदी यांची प्रशंसा केली होती.

पुतिन यांनी मॉस्कोच्या थिंक टँक वालदाई इंटरनॅशनल डिस्कशन क्लब येथे आयोजित पूर्ण अधिवेशनाला संबोधित करताना ही टिप्पणी केली होती.

हे ही वाचा :

लेण्याद्री : शिवनेरीवर सहा वर्षांच्या मुलावर माकडाचा हल्ला

International affairs : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन व इटलीचे माजी प्रधानमंत्री बर्लुस्कोनी यांच्यात व्होडका-वाईनसह शुभेच्छा संदेश

Back to top button