International affairs : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन व इटलीचे माजी प्रधानमंत्री बर्लुस्कोनी यांच्यात व्होडका-वाईनसह शुभेच्छा संदेश | पुढारी

International affairs : रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन व इटलीचे माजी प्रधानमंत्री बर्लुस्कोनी यांच्यात व्होडका-वाईनसह शुभेच्छा संदेश

पुढारी ऑनलाइन डेस्क :  International affairs : रशियाचे अध्यक्ष पुतिन यांनी इटलीचे माजी प्रधानमंत्री सिल्वियो बर्लुस्कोनी यांना व्होडकाच्या 20 बाटल्यांसह त्यांच्या जन्मदिनानिमित्त शुभेच्छा संदेश पाठवले. तर बर्लुस्कोनी यांनी रिटर्न गिफ्टमध्ये लैम्ब्रुस्को रेड वाइनच्या 20 बाटल्या शुभेच्छा संदेशासह पाठविल्या आहेत.

पुतिन आणि बर्लुस्कोनी यांच्यातील संदेशाच्या देवाण-घेवाणीची बातमी सध्या मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे. त्याचे कारण बर्लुस्कोनी यांची प्रसारित झालेली एक ऑडिओ क्लिप ज्यामध्ये ते फक्त रशियाचे अध्यक्ष पुतिन यांच्या सोबत शुभेच्छा संदेशांची देवाण-घेवाण करत नाहीए तर ऑडिओ क्लिपमधील संवादानुसार ते रशिया युक्रेन युद्धाबाबत पुतिन यांचा बचावही करत आहेत.

International affairs : इटलीच्या ‘ला प्रेस’ या वृत्त एजन्सीने याविषयीचे वृत्त दिले आहे. त्यात म्हटले आहे की, ऑडिओ टेपमध्ये बर्लुस्कोनी (86) या आठवड्यात संसदेतील त्यांच्या मध्यमार्गी-दक्षिणपंथी पार्टी फोर्जा इटैलियाच्या सांसद सोबत बोलत आहेत. त्यात ते त्यांना म्हणत आहेत की नुकतेच त्यांचा रशियाचे राष्ट्रपति पुतिन यांच्याशी संपर्क झाला होता. त्यांनी मला 20 बाटल्या व्होडका सोबत एक खूप छान संदेश पाठवला होता. त्यानंतर मी रिटर्न गिफ्ट म्हणून त्यांना लैम्ब्रुस्को रेड वाइनच्या 20 बाटल्यांसह एक शुभेच्छा संदेश पाठवला.

माहितीनुसार संदेशांची ही देवाण-घेवाण बर्लुस्कोनीच्या 86 व्या वाढदिवसानिमित्त करण्यात आली होती. घटनेची जोरदार चर्चा सुरू आहे कारण नुकतेच इटलीत राष्ट्रीय निवडणुकीत दक्षिणपंथियांना विजय मिळाला आहे. जॉर्जिया मेलोनी यांच्या नेतृत्वात इटलीच्या कंजरवेटिव गठबंधन रशिया-युक्रेन युद्धात युक्रेनचे समर्थन करीत आहे. या गठबंधनमध्ये सहभागी असलेल्या फोर्जा इटालिया पार्टीचे दिग्गज नेता बर्लुस्कोनी जे इटलीचे माजी पंतप्रधान आहेत ते रशियाचे राष्ट्रपति पुतिन यांच्याशी असलेल्या संबंधाविषयी चर्चा करत आहे. इतकेच नाही तर युद्धाबाबत पुतिन यांचा बचाव देखिल करत आहेत.

International affairs : ऑडिओ टेपमध्ये बर्लुस्कोनी पुढे म्हणाले आहे की, आपण युक्रेनला हत्यारे आणि वित्तीय पोषण देत आहे त्यामुळे रशियाचे अधिकारी साततत्याने पश्चिमी देशांनी रशियाच्या विरोधात युद्ध पुकारले आहे असे म्हणत असतात.

‘ला’ ने दिलेल्या वृत्तानुसार बर्लुस्कोनी यांनी यापूर्वीही पुतिन यांचा बचाव केला आहे. यापूर्वी ते रूस-युक्रेन युद्धाबाबत रशियाचे योग्य आहे, कारण युक्रेन डोनबास क्षेत्रात मास्को समर्थक अलगाववाद्यांनी पुतिन यांना मजबूर केले होते.

Putin Declares Martial Law : रशियाकडून युक्रेनच्या 4 भागात ‘मार्शल लॉ’ लागू! पुतिन यांची घोषणा

कठोर निर्णय घेत भारताचा रशियाला धक्का, UN मध्ये पुतिन यांच्या मागणीच्या विरोधात मतदान

Back to top button