

पुढारी ऑनलाइन डेस्क : अमेरिकेतील मेरीलँड येथे एका कुटुंबातील तीन सदस्यांनी $1 (82 रुपये) गुंतवले आणि कमवले $50,000 जवळपास (4140277.50 लाख रुपये). कुटुंबातील तिन्ही सदस्यांनी एकाच दुकानातून लॉटरीची तिकिटे खरेदी केली. परंतु या तिघांनीही वेगवेगळ्या वेळी दुकानात जाऊन एकाच अंक क्रमांकाची लॉटरी खरेदी केली.
61 वर्षांच्या वडिलांनी $1 (82 रुपये) लॉटरीचे हे तिकीट कॅरोल काउंटीमधील एका दुकानातून खरेदी केले होते. त्यांनी हे तिकीट पिक 5 इव्हनिंग लकी ड्रॉ स्पर्धेसाठी विकत घेतले होते. वडिलांनंतर 28 वर्षीय मुलीनेही याच दुकानातून त्याच ड्रॉसाठी तिकीट खरेदी केले. आणि यानंतर 31 वर्षीय मुलानेही तिकीट खरेदी केले. तिकीट घेत असताना त्यांनी समान अंकी क्रमांक देखील घेतले.
दरम्यान, कुटुंबातील तिन्ही सदस्यांनी 5-3-8-3-4 अंकी संख्या असलेले तिकीट खरेदी केले. लॉटरीचा निकाल हा त्याच कुटुंबातील तिन्ही सदस्यांच्या बाजूने लागला. यामध्ये प्रत्येकाला सुमारे $50,000 (41 लाख रुपये) प्रत्येकी मिळाले.
याबाबत लॉटरी विजेत्यांनी सांगितले की, लॉटरीचा निकाल लागला आणि त्यावर आमचा विश्वास बसला नाही. तर दुसरा विजयानंतर आम्हाला धक्काच बसला. यानंतर पत्नीला याबाबत माहिती दिली तेव्हा तिला खूप आनंद झाला. जिंकलेल्या पैशाचे काय करणार याबाबतही खुलासा करत म्हणाले, कुटुंबाच्या पुढच्या पिढीसाठी एक सेटअप तयार करायचा आहे, असे ते म्हणाले.
हेही वाचा