ब्रिटनमध्ये महागाईचा भडका; लोकांवर उपासमारीची वेळ – Millions in Britain skipping meals | पुढारी

ब्रिटनमध्ये महागाईचा भडका; लोकांवर उपासमारीची वेळ - Millions in Britain skipping meals

ब्रिटनमध्ये महागाईचा भडका; लोकांवर उपासमारीची वेळ

पुढारी ऑनलाईन – ब्रिटनमध्ये महागाईचा दर हा १० टक्के इतका झाला आहे. वाढत्या महागाईमुळे ब्रिटनमधील अनेक नागरिक जेवण टाळून खर्चाला आळा घालत आहेत, असा धक्कादायक अहवाल ब्रिटनमधील एका संस्थेने प्रसिद्ध केला आहे. (millions in Britain skipping meals)

ब्रिटनमधील Which? या संस्थेने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. ३००० लोकांच्या पाहणीतून हा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला आहे. याशिवाय अनेक नागरिक पौष्टिक खाद्यपदार्थ घेऊ शकत नाहीत, असेही या अहवालात म्हटले आहे.

संस्थेचे अन्न धोरणाचे प्रमुख सु डेव्हिस म्हणाले, “ब्रिटनमध्ये सध्या कॉस्ट ऑफ लिव्हिंग (जगण्यासाठीचा खर्च) हा अतिशय चिंतेचा विषय बनला आहे. त्यामुळे अनेक नागरिक उपाशी राहात आहेत, तर अनेकांना पौष्टिक खाद्यपदार्थ खाता येत नाहीत.”

ब्रिटन सरकार Energy Prize Freeze ही योजनाही बंद करणार आहे. या योजनेनुसार ब्रिटनमधील वीजपुरवठा कंपन्या ठराविक रकमेपेक्षा जास्त बिल आकारू शकत नाहीत. ही योजना बंद झाली तर ब्रिटनमधील अनेकांना थंडीच्या दिवसांत घर उबदार ठेवता येणार नाही, असेही सु यांनी म्हटले आहे. ही योजना बंद झाली तर देशातल लक्षावधी लोक हे ऊर्जेच्या अनुषंगाने गरीब बनतील, असे या संस्थेने म्हटले आहे.

ब्रिटनमधील वाढती महागाई आणि वेतन यांचा कोणताच ताळमेळ नसल्याने अनेक ठिकाण कर्मचारी आंदोलन करत आहेत. ट्रेड युनियन काँग्रेस या कामगारांच्या सर्वोच्च संघटनेने पंतप्रधानांच्या लिझ ट्रस यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

हेही वाचा

Back to top button