धक्कादायक : कोरोना महामारीमुळे ५ कोटी ६० लाख भारतीय गरिबीच्या खाईत – जागतिक बँक | पुढारी

धक्कादायक : कोरोना महामारीमुळे ५ कोटी ६० लाख भारतीय गरिबीच्या खाईत - जागतिक बँक

कोरोना महामारीमुळे ५ कोटी ६० लाख भारतीय गरिबीच्या खाईत - जागतिक बँक

पुढारी ऑनलाईन – कोरोनाच्या महामारीमुळे भारतातील ५ कोटी ६० लाख लोक गरिबीत ढकलले गेले आहेत, असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटले आहे. कोरोना महामारीमुळे जगभरातील ७ कोटी १० लोक दारिद्र्याच्या खाईत फेकले गेले त्यातील सर्वाधिक म्हणजे ७९ टक्के लोक हे भारतातील आहेत, असे जागतिक बँकेने म्हटले आहे. Poverty Due To COVID-19

Poverty and Shared Prosperity 2022” या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. जागतिक बँकेने म्हटले आहे की, “कोरोना महामारी हा जागतिक अर्थव्यवस्थेसाठी फार मोठा फटका होता. Global Extreme Poverty Rate हा कोरोना काळात ९.३ टक्के इतका वाढला. कोरोनाच्या पूर्वी हा दर ८.४ टक्के इतका होता. २०२०च्या अखेरीस जगभरताली ७ कोटी १० लाख लोक भीषण गरिबीत ढकलेले गेले. त्यामुळे २०२०ला दारिद्र्यात जगणाऱ्या लोकांची संख्या जगभरात ७० कोटी इतकी झाली.”

जा देशांची लोकसंख्या अधिक आहे, त्यांचा गरिबीतील वाटाही अधिक आहे. फक्त चीनच्या अर्थव्यवस्थेला २०२०मध्ये मोठा फटका बसला नाही. तर या उलट कोरना काळात भारताची अर्थव्यवस्था दीर्घकाळ संकुचित झाली होती. हा अहवाल बनवताना Centre for Monitoring Indian Economy या संस्थेने जमवलेल्या आकडेवारीचा अभ्यास करण्यात आला आहे. गरिबी हटवण्यात रशिया आणि युक्रेनच्या युद्धाने २०२२मध्ये नवा अडथळा निर्माण केला आहे. महागाई, चीनमधील मंदी अशा परिस्थितीमुळे जगाच्या आर्थिक विकासावर मोठा परिणाम झाला आहे.

हेही वाचा

Back to top button