The covid-19 pandemic : कोरोना महामारीचा तरुणाईच्‍या व्‍यक्‍तिमत्त्‍वावर परिणाम : नवीन संशोधनातील निष्‍कर्ष | पुढारी

The covid-19 pandemic : कोरोना महामारीचा तरुणाईच्‍या व्‍यक्‍तिमत्त्‍वावर परिणाम : नवीन संशोधनातील निष्‍कर्ष

पुढारी ऑनलाईन डेस्‍क – २०२० या वर्षात कोरोना महामारीने संपूर्ण जगाला वेढीस धरले. या महामारीचा परिणाम नागरिकांच्‍या शारीरिकच नव्‍हे तर मानसिक आरोग्‍यावरही झाला. कोरोना प्रतिबंधासाठी नियमांमध्‍ये लॉकडाउन, सोशल डिस्‍टसनमुळे तरुणाईच्‍या व्‍यक्‍तिमत्त्‍वात बदल झाल्‍याचे नवीन संशोधनात नमूद करण्‍यात आले आहे. ( The covid-19 pandemic )

The covid-19 pandemic : कशावर झाले संशोधन?

कोरोना काळात तरुणाईच्‍या मानसिकतेमध्‍ये कोणते बदल झाले, यावर फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीच्या टीमने संशोधन केले. हे संशोधन ऑनलाईन झाले. यासाठी नावनोंदणी करण्‍यात आली. यामध्‍ये ७हजार १०९ जणांनी सहभाग घेतला. त्‍यांच्‍या व्यक्तिमत्त्वांचे मूल्यांकन करण्‍यात आले. साथीच्‍या रोगांमुळे नागरिकांच्‍या व्‍यक्‍तिमत्त्‍वावर कोणता परिणाम होतो, हे पाहणे या संशोधनाचा मूळ उद्देश होता. सामजिक अलिप्‍ततेचा तरुणाईच्‍या मानसिकतेवर मोठा परिणाम झाल्‍याचे या संशोधनातील निष्‍कर्षामध्‍ये नमूद करण्‍यात आले आहे.

तरुणांच्‍या व्‍यक्‍तिमत्त्‍वावर का झाला खोलवर परिणाम ?

पीएलओएस वन जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्‍या संशोधनानुसार, कोरोना काळात तरुणाईच्‍या व्‍यक्‍तिमत्त्‍व विकासाला खीळ बसली. असे मानले जाते की, साथीच्या रोगाला प्रतिबंध करण्‍यासाठी लॉकडाऊनची अंमलबजावणी झाली. याचा परिणाम तरुणाईच्‍या मानसिकदृष्‍ट्या परिपक्‍क होण्याच्या प्रक्रियेवर झाला. त्यांच्या विकासात व्यत्यय आला. या संशोधनात सहभागी झालेले प्रोफेसर वाइबके ब्लेइडॉर्न म्हणाले की, कोरोना काळात अगदी वेगळ्‍या परिस्‍थितीला सामोरे जावे लागले. आता व्‍यक्‍तिमत्त्‍वात झालेले बदल हे सर्वांसाठी आव्‍हानात्‍मक असणार आहेत.

या संशोधनाला काही मर्यादा होत्‍या असे फ्लोरिडा स्टेट युनिव्हर्सिटीतील प्रो. सुतीन यांनी म्‍हटलं आहे. बदलाच्‍या कारणांची मोजमापच झाले नाही. साथीच्‍या रोगामुळे तरुणाईचे संपूर्ण व्‍यक्‍तिमत्त्‍व बदलेले नाही.  कारण कोरोनाचा सथीच्‍या परिणामपेक्षा राजकीय आणि सामाजिक बदलाचाही व्‍यक्‍तिमत्त्‍वावर परिणाम होतो, असेही त्‍यांनी स्‍पष्‍ट केले.

कोरोनामुळे मेंदूवर कसा परिणाम झाला?

संशाेधकांनी यापूर्वी SARs-CoV-2 विषाणूचा मेंदूच्या संरचनेवर कसा परिणाम होतो हे पाहिले आहे. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या नेचर जर्नलमध्ये प्रकाशित केलेल्या अभ्यासानुसार, कोविड-19 चा न्यूरोलॉजिकल प्रभाव पडू शकतो. मात्र या हानिकारक प्रभाव दीर्घकाळ टिकून राहतील का, अतिरिक्त पाठपुरावा करून तपास करणे बाकी असल्‍याचेही त्‍यांनी म्‍हटले आहे.

हेही वाचा : 

Back to top button