पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियामध्ये सर्वाधिक वापरकर्ते असणार्या फेसबुकबाबत एक धक्कादायक बातमी (Facebook Followers) समोर येत आहे. फेसबुक युझर्समधील फाॅलोवर्सच्या संख्येत घट झाली आहे. यामध्ये फेसबुकचा मालक असलेला मार्क झुकेरबर्ग याचेही फाॅलोवर्स कमी झाले आहेत.
गेल्या काही तासात अनेक फेसबुक युझर्सच्या फाॅलोवर्सची संख्या अचानक घटली आहे. यात युझर्स आहेतच त्याचबरोबर खुद्द फेसबुकचा मालक असलेला मार्क झुकेरबर्गचेही फाॅलोवर्स घटले आहेत. आता त्याचे फक्त ९९९३ एवढेच राहिले आहेत. फेसबुकच्या एका बगमुळे रातोरात अनेकांच्या फाॅलोवर्सच्या संख्येत घट झाली आहे. हे फक्त भारतातचं नाहीत अमेरिकेतही अनेकांबाबतीत झालं आहे. असं पहिल्यांदाच घडलं आहे. याबद्दल फेसबूक मेटाने कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
फाॅलोवर्सची कमी झाल्याची तक्रार अनेकांनी ट्विटरवर मार्क झुकेरबर्गला टॅग करत तक्रार केली आहे. अमेरिकेतील अनेक मीडिया कंपनींचेही फेसबुक फॉलोवर्स कमी झाले आहेत.
हेही वाचलंत का?