हिजाबविरोधी आंदोलनात आतापर्यंत ९२ जणांचा मृत्यू, इराण सरकारकडून कारवाईचा इशारा | पुढारी

हिजाबविरोधी आंदोलनात आतापर्यंत ९२ जणांचा मृत्यू, इराण सरकारकडून कारवाईचा इशारा

पुढारी ऑनलाईन डेस्क : महसा अमीन यांच्या मृत्यूनंतर सुरू झालेले हिजाब विरोधी आंदोलन देशाला अस्थिर करू शकते, असा इशारा इराणच्या संसदेचे सभापती मोहम्मद बगहर क्वालीबाफ यांनी दिला आहे. वर्तमानस्थितीत सुरू असलेल्या आंदोलनाचा उद्देश सरकार पाडण्याचा आहे. या पूर्वी सुरू असलेले शिक्षकांचे आंदोलन सुधारणा करण्यासाठी होते, असेही ते म्हणाले.

दरम्यान, हिजाब न घालण्याच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या महसा अमीन हिचा पोलीस कस्टडीत असताना मृत्यू झाला. यानंतर विद्रोही लोकांनी सशस्त्र संघर्ष सुरू केला आहे. गेल्या काही दिवसांपासून इराणसह अनेक देशांमध्ये हिजाबविरोधी आंदोलन सुरू आहे. याबाबत इराण सरकारने म्हटले आहे की, पोलिसांकडून कारवाई झाल्यानंतर आंदोलनाची तीव्रता कमी होत आहे. शुक्रवारी इराणच्या संसदेत खासदारांनी या आंदोलकांच्या विरोधात घोषणा दिल्या. यावेळी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्लाह अली खामनेई यांनीही खासदारांच्या या घोषणांचे समर्थन केले.

आत्तापर्यंत ९२ आंदोलकांनी गमावला जीव

नॉर्व्हे स्थित एनजीओ इराण ह्युमन राईट्सने म्हटले आहे की, पोलिसांच्या ताब्यात असलेल्या २२ वर्षीय महसा अमिनी हिच्या मृत्यूनंतर सुरू झालेल्या आंदोलनात ९२ लोकांचा मृत्यू झाला आहे.

तुरूगांत असलेल्या बाकर नमाजीला देश सोडण्याची मुभा

सूत्रांच्या माहितीनुसार संयुक्त राष्ट्र संघटनेने शनिवारी (दि.२) म्हटले आहे की, २०१६ मध्ये हेरगिरीच्या आरोपाखाली इराणने ताब्यात घेतलेल्या बाकर नमाजीला एका आठवड्यासाठी विदेशात उपचार करण्याची मुभा दिली आहे.

हेही वाचलंत का?

Back to top button