Twitter Video Scrolling Mode : खुशखबर! टिकटॉकसारखी फिचर सुविधा आता ट्विटरमध्ये दिसणार | पुढारी

Twitter Video Scrolling Mode : खुशखबर! टिकटॉकसारखी फिचर सुविधा आता ट्विटरमध्ये दिसणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : सोशल मीडियाच्या इन्स्टाग्राम, ट्विटर, फेसबुक या माध्यमांवर उभ्या आकाराच्या व्हिडिओ जास्त चालतात. अशा व्हिडिओ याआधी सर्वप्रथम टिकटॉक या माध्यमावर पहायला मिळत होत्या. आता याच फिचरची सुविधा ट्विटर हे मायक्रोब्लॉगिंग माध्यम देणार आहे. मोबाईलच्या फुल-स्क्रीनवर दिसणाऱ्या या फिचरमुळे ट्विटर युजर्सना मोठी खुशखबर मिळाली आहे. या व्हिडिओमध्ये बाकीच्या माध्यमावर असणाऱ्या स्क्रोलिंगचा पर्याय देखील यामध्ये असणार आहे. (twitter video scrolling mode)

कसे असेल हे व्हिडिओ फिचर

ट्विटरने एक पोस्ट केली आहे, ज्यामध्ये या नव्या व्हिडिओ फिचर्सबाबत माहिती दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनूसार ट्विटरच्या सुधारित इमर्सिव मीडिया व्ह्यूअर अॅपवर सिंगल क्लिकवर पूर्णस्क्रीनमध्ये व्हिडिओ दिसेल.

कसे चालेल?

  • या नव्या व्हिडिओ फिचर्सवर एकदा टॅप केल्यानंतर पूर्ण-स्क्रीन दिसण्यास चालू होईल.
  • यानंतर तुम्ही व्हिडिओ फीडवर पोहोचते.
  • हे व्हिडिओ उभे स्क्रोल करून पुढील व्हिडिओ पाहता येते.
  • बॅकअप क्लिक केल्यानंतर, मूळ ट्विटवर परत येते.

ट्विटरने आपल्या एक्सप्लोर पेजवर व्हिडिओची माहिती देण्यास सुरुवात केली आहे. सर्च बटण दाबून ही उभी व्हिडिओची फिचर पाहता येते. बातम्या आणि ट्रेंडिंग हॅशटॅगच्या सूचीमध्ये त्याच्या सूचना सापडतील.  हे फीचर अँड्रॉइड यूजर्ससाठी लवकरच उपलब्ध होईल असे अश्वासन कंपनीकडून देण्यात आले आहे.

हेही वाचा

Back to top button