Jasprit Bumrah out of T20 World Cup : अखेर जसप्रीत बुमराह टी-२० विश्वचषकातून बाहेर, बीसीसीआयची अधिकृत घोषणा | पुढारी

Jasprit Bumrah out of T20 World Cup : अखेर जसप्रीत बुमराह टी-२० विश्वचषकातून बाहेर, बीसीसीआयची अधिकृत घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय संघ दोन आठवड्यानंतर टी-२० विश्वचषकासाठी ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. भारतीय संघाची विश्वचषकातील पहिली लढत २३ ऑक्टोंबरला पाकिस्तानविरुद्ध असेल. दरम्यान, विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा झटका बसला आहे. भारताचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमराह विश्वचषक खेळू शकणार नसल्याचे बीसीसीआयने अधिकृत स्पष्ट केले आहे. (Jasprit Bumrah out of T20 World Cup)

बुमराह गेल्या काही दिवसांपासून पाठीच्या दुखापतीने त्रस्त आहे. दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या सामन्यात जसप्रीत बुमराह नसल्याने शेवटच्या षटकात भारताची कामगिरी अतिशय सुमार राहिली आहे. पाठीच्या दुखापतीमुळे बुमराह दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या टी-२० मालिकेतूनही बाहेर पडला होता.

बुमराह बाबत बीसीसीआयने म्हटले आहे की, भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह विश्वचषकातून बाहेर पडला आहे. वैद्यकिय तज्ज्ञांच्या मतानुसार आणि विस्तृत तपासणीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. बुमराहच्या जागी नव्या खेळाडूचा भारतीय संघात समावेश करण्यात येणार आहे. (Jasprit Bumrah out of T20 World Cup)

आशिया चषक स्पर्धाही खेळू शकला नव्हता बुमराह

जसप्रीत बुमराह जखमी असल्याने आशिया चषक स्पर्धा खेळू शकला नव्हता. त्यामुळे आशिया चषक स्पर्धेत भारताची कामगिरी निराशाजनक राहिली होती. दरम्यान, दक्षिण आफ्रेविरुद्ध भारतीय संघात परतलेला जसप्रीत बुमराह पुन्हा एकदा पाठीच्या दुखापतीने त्रस्त झाला आहे. यॉर्कर हे बुमराहचे सर्वांत महत्वाचे अस्त्र आहे. याच अस्त्राने त्याने अनेक फलंदाजांना आस्मान दाखवले आहे. ((Jasprit Bumrah out of T20 World Cup)

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या एकदिवसीय फॉरमॅटमध्ये जसप्रीत बुमराहच्या नावावर १२१ बळी आहेत. एकदिवसीय सामन्यात १९ धावा देत ६ बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. तर टी-२० क्रिकेटमध्ये त्याने ६० सामने खेळत ७० बळी घेतले आहेत. जसप्रीत बुमराहने कसोटी क्रिकेटमध्ये ८ वेळेस ५ बळी घेतले आहेत. (Jasprit Bumrah out of T20 World Cup)

हेही वाचंलत का

Back to top button