Worst Toilet : १. ३ कोटी रुपयांचा चुराडा करत 'त्‍याने' ९१ देशांतून शोधले सर्वात खराब सार्वजनिक शौचालय! | पुढारी

Worst Toilet : १. ३ कोटी रुपयांचा चुराडा करत 'त्‍याने' ९१ देशांतून शोधले सर्वात खराब सार्वजनिक शौचालय!

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : कोणाला कशाचं कुतूहल असेल हे सांगता येणे कठीण असते. अशाच कुतूहलातून जगातील सर्वात खराब
सार्वजनिक शौचालय ( Worst Toilet ) काेठे असेल, या प्रश्‍नाचे उत्तर शाेधण्‍यासाठी ब्रिटनमधील एका नागरिकाने ९१ देशातील १.२ लाख किलोमीटर प्रवास केला. तब्‍बल १.३ कोटी रुपये खर्च केले. अखेर त्‍यांना सर्वात खराब टॉयलेट हे ताजिकिस्‍तानमध्‍ये सापडले.

ही गोष्‍ट आहे. ब्रिटीश ब्‍लागर ग्रॅहम अस्‍के यांची. त्‍यांनी जगातील सर्वात खराब सार्वजनिक शौचालयाचा शोध घेण्‍याचे ठरले. अखेर ९१ देशात १.२ लाख किलोमीटरचा प्रवास करुन त्‍यांनी ताजिकिस्‍तानमध्‍ये एक टॉयलेट शोधले . तंबू स्‍वरुपातील हे टॉयलेट आहे. ताजिकिस्‍तान हा अफगाणिस्‍तानच्‍या जवळचा देश आहे. हे इतकं वाईट आहे की, या टॉलेटसाठी फॅब्रिकच्‍या भिंती सामायिक कागद वापरला आहे. येथे साप आणि उंदराचाही त्रास होण्‍याचा धोका असल्‍याचे ग्रॅहम यांनी म्‍हटलं आहे.

ताजिकस्‍तानमधील सर्वात खराब सार्वजनिक शौचालय शोधण्‍यापूर्वी ग्रॅहम यांनी सहा खंडांमधील शेकडो सार्वजनिक शौचालयांना भेट दिली. याची माहिती त्‍यांनी त्‍याचे पुस्‍तक ‘टॉयलेट्स ऑफ द वाइल्ड फ्रंटियर’ मध्ये दिली आहे. या पुस्‍तकात बांगलादेशातील एक सिंक आणि चीनमधील एका स्‍नानगृहाचाही समावेश आहे.

Worst Toilet : ग्रॅहम यांनी का घेतला हा शोध?

आपल्‍या या शोधाबाबत ब्रिटनमधील दैनिक ‘मिरर’शी बोलताना ग्रॅहम म्‍हणाले की, “जगातील सर्वात भयंकर परिस्‍थिती कोठे असेत ते तर ती खराब टॉयलेटमध्‍ये. मी मोरोक्‍को येथे गेलो असताना येथे सार्वजनिक शौचालयाचे खराब बांधकाम पाहिलं. सार्वजनिक शौचालये ही आरोग्‍यासाठी खूपच महत्त्‍वपूर्ण भूमिका बजावतात. त्‍यामुळे ती स्‍वच्‍छच असली पाहिजेत. या साठी जगातील सर्वात खराब शौचालयाचा मी शोध घेतला. ही पृथ्‍वीवरील अशी दुर्गम ठिकाणे आहेत की,जेथे एक मिनिट व्‍यतित करणेही खूपच भयंकर ठरते.”

ताजिकिस्‍तानमध्‍ये पाहिलेले सार्वजनिक शौचालय हे जागातील सर्वात वाईट असावे, असे मला वाटते. ते एक प्रकारवे नरकाचे छिद्र आहे. विशेष म्‍हणजे नरकयातना देणारे हे टॉयलेट स्‍थानिकांनी पुरेपूर वापरले आहे. आरोग्‍यासाठी सार्वजनिक शौचालयांचे महत्त्‍व लक्षात घेवून सार्वजनिक शौचालय स्‍वच्‍छ ठेवण्‍यासाठी आगृही असणार्‍या संस्‍थांना सर्वांनी समर्थन  द्‍यावे, असे आवाहनही त्‍यांनी केले आहे.

हेही वाचा :

Back to top button