Bicycle Lover Celebs : महाग सायकल घेण्यात 'हे' स्टार्स आहेत आघाडीवर | पुढारी

Bicycle Lover Celebs : महाग सायकल घेण्यात 'हे' स्टार्स आहेत आघाडीवर

पुढारी ऑनलाईन डेस्क : बॉलिवूड कलाकारांना नेहमीच महागड्या वस्तूची क्रेझ असते. त्यांच्या मेकअपपासून ते फिरणाऱ्या महागड्या गाड्यापर्यत्नच्या वस्तू त्याच्याकडे पाहायला मिळतात. काही कलाकारांच्या कारची किंमती ऐकूनच लोकांना आश्चर्याचा धक्का बसतो; परंतु, काही कलाकारांना याला अपवाद आहेत. महागड्या कारसोबत त्याच्याकडे सायकलीही पाहायला मिळतात. काही कलाकार त्याच्या सालकलीवरून ( Bicycle Lover Celebs ) मनसोक्त फिरण्याचा आनंद लुटत असतात. यात बॉलिवूड अभिनेता सलमानसह अनेक दिग्गज कलाकारांचा सहभाग आहे.  जाणून घेवूयात अशाच काही महागड्या गाडीसोबत सायकली असणाऱ्या बॉलिवूड स्टार्स आणि सायकलींच्या किंमतीबद्दल….

सलमान खान

बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या सायकलीवरून अनेकदा मुंबईच्या रस्त्यांवर स्पॉट झाला आहे. सलमान नेहमीच त्याच्या सायकलवरून फिरण्याचा आंनद घेत असतो. सलमानच्या या फोर्डेबल सायकलची साधारण किमंत ३ लाख रुपयांच्या जवळपास आहे. मिळालेल्या माहितीनुसार, त्याच्याकडे असणाऱ्या ‘बिइंग ह्युमन’ ब्रँडची सायकलची किंमत ४०, ३२३ रुपये ते ५७. ५७७ रुपये आहे.

रणबीर कपूर

बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर त्याच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणबीरला महागड्या कार आणि बाईक्सचा खूपच क्रेझ आहे. परंतु, रणबीरला गाड्यासोबत सायकलिंगचीही तितकीच आवड आहे. मिळालेल्या माहितीनुसार, रणबीरकडे असणाऱ्या मॅट एक्स फोल्डेबल सायकलीची किंमत सुमारे दीड लाख रुपये आहे. या सायकलमध्ये १००० वॅट्सची पॉवरफुल मोटर आणि स्मार्ट एलसीडी डिस्प्लेही आहे. या सायकलसोबत रणबीरला अनेकवेळा पहिलं गेलं आहे.

शाहिद कपूर

बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरदेखील महागड्या गाड्यासोबत सायलिंगची आवड आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शाहिदकडे डुकाती स्क्रॅबलर या कंपनीची इलेक्ट्रिक सायकल आहे. यांची किंमत अडीच ते तीन लाख रुपयांच्या घरात आहे. शाहिद कपूर अनेकवेळा त्याच्या सायकलवरून मुंबईच्या रस्त्यावर फिरताना दिसला आहे.

सारा अली खान

बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान अनेकदा महागड्या कारमधून फिरताना दिसते. पण, सारालाही सायकलिंगची खूप आवड आहे. साराच नाही तर तिचा भाऊ इब्राहिम अली खानलाही सायकलिंग करणे आवडते. मिळालेल्या माहितीनुसार, साराकडे यू-बेंड चेचिस कंपनीची वोग सेलेक्ट सायकल आहे. या सायकलची किंमत १५ हजार रुपये आहे.

आयुष्मान खुराना

बॉलिवूड अभिनेता आयुष्मान खुरानाही सायकलिंग करण्याचा छंद आहे. आयुष्मानकडे असणाऱ्या सायकलची किंमत जवळपास ३ लाखांच्या घरात आहे.

सूरज पंचोली

आदित्य पांचोलीचा मुलगा आणि बॉलिवूड अभिनेता सूरज पांचोली सायकलवरून फिरताना स्पॉट झाला आहे. सूरजकडे असणाऱ्या सायकलची किंमत सुमारे ५.५ लाख रुपये आहे. सूरजकडे अशाप्रकारच्या दोन सायकली आहेत.

जहीर इकबाल

बॉलिवूड अभिनेता जहीर इकबालच्या इन्स्टाग्रामवर त्याचे सायकलीसोबतचे फोटो पाहायला मिळतात. मिळालेल्या माहितीनुसार, जहीरकडच्या निळ्या रंगाच्या इलेक्ट्रिक सायकलची किंमत साधारण १.५ लाख रूपयांची आहे.

अक्षय कुमार

बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार त्याच्या फिटनेसची नेहमी काळजी घेतो. यामुळे तंदुरुस्त राहण्यासाठी तो सायकलिंगचा वापर करतो. अक्षय कुमार त्याच्या सायकलीसोबत फिरताना अनेकवेळा दिसला आहे. त्‍याच्‍याकडेही महागड्या सायकल्‍स आहेत.

दिया मिर्झा

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाला सायकल चालवण्याची आवड आहे. ती अनेकदा सायकल चालवताना स्पॉट झाली आहे. ( Bicycle Lover Celebs )

हेही वाचलंत का? 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sara Ali Khan (@saraalikhan95)

 

View this post on Instagram

 

A post shared by Ayushmann Khurrana (@ayushmannk)

Back to top button