नॉर्दन अलायन्स चीफ कमांडर ठार, तालिबानचा पंजशीरवर कब्‍जा | पुढारी

नॉर्दन अलायन्स चीफ कमांडर ठार, तालिबानचा पंजशीरवर कब्‍जा

काबूल ; पुढारी ऑनलाईन:  तालिबान्‍यांनी पंजशीरवर कब्‍जा केल्‍याचा दावा केला आहे. नॉर्दन अलायन्स आणि तालिबान यांच्यातील संघर्ष नॉर्दन अलायन्सचे प्रवक्‍ते फहीम दश्ती यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली होती. या पाठोपाठ नॉर्दन अलायन्स चीफ कमांडर मोहम्‍मद सालेह यांचाही हेही या संघर्षात ठार झाल्‍याचे तालिबान्‍यांनी म्‍हटले आहे. अफगाणिस्‍तानमधील वृत्तसंस्‍था असवाकने दिलेल्‍या रिर्पाटनुसार, तालिबान्‍यांनी पंजशीरमधील गव्‍हर्नर हाऊसवर कब्‍जा केला आहे.

चकमकीत चीफ कमांडर ठार झाल्‍याचा दावा

अफगाणिस्‍तानची सत्ता हस्‍तगत केलेल्‍या देशातील ३४ प्रांतापैकी पंजशीर प्रांताने तालिबान्‍यांना आव्‍हान दिले हाेते. मागील काही दिवस पंजशीरवर कब्‍जा करण्‍यासाठी तालिबानी धडपड करत हाेते.  यापूर्वी नॉर्दन अलायन्सचा (उत्तर आघाडी) प्रवक्‍ता फहीम दश्‍ती आण नॉर्दन अलायन्‍सचे नेते महमद मसूद याचा भाचा हाही ठार झाल्‍याचे तालिबान्‍यांनी केला होता. यानंतर चकमकीमध्‍ये पंजशीरचे चीफ कमांडर मोहम्‍मद साहेल हे ठार झाल्‍याचा दावा तालिबान्‍यांनी केला आहे.

प्रवक्‍ता फहीम दश्‍ती जवळपास ३० वर्षांपासून नॉर्दन रेझिस्टन्स फोर्स (NRF) काम करत होते. २००१ साली जेव्हा अल कायदा आणि तालिबाननं मिळून नॉर्दन आघाडीचे प्रमुख अहमद शाह मसूद यांची हत्या केली, तेव्हा  दश्ती या हल्ल्यातून थोडक्यात बचावले होते.

दोनच दिवसांपूर्वी पंजशीरमधील नॉर्दन अलायन्‍सने प्रतिहल्‍ला करत तालिबान्‍यांचे मोठे नुकसान केले होते. यावेळी झालेल्‍या चकमकीत सुमारे ६०० हून अधिक तालिबानी ठार झाले होते. तर एक हजारहून अधिक जणांनी शरणागती पत्‍करली होती. या मोहिमेचे नेतृत्‍व नॉर्दन अलायन्सचे प्रवक्‍ते फहीम दश्‍ती यांनी केले होते.

सालेह सुरक्षितस्‍थळी तर महमद मसूद ताजिकिस्‍तानमध्‍ये

तालिबानच्‍या चकमकीत नॉर्दन आलायंसचा चीफ कमांडर ठार झाल्‍यानंतर अफगाणिस्‍तानचे माजी उपराष्‍ट्रपती अमरुल्‍लाह सालेह हे सुरक्षितस्‍थळी रवाना झाले आहेत.

तर नॉर्दन अलायन्‍सचे नेते अहमद मसूद हे मागील तीन दिवस ताजिकिस्‍तानमध्‍ये असल्‍याचे सूत्रांनी सांगितले.

अहमद मसूदने फडकावले पांढरे निशाण

फाहीम दश्‍ती ठार झाल्‍यानंतर नॉर्दन अलायन्‍सचा नेता अहमद मसूद याने युद्‍ध विरामाचे आवाहन केले आहे.

तालिबान्‍यांनी पंजशीरमधून माघार घेतली तर तात्‍काळ लढाई थांबवली जाईल, असे अहमद मसूद याने म्‍हटले आहे.

हेही वाचलं का ? 

पहा व्‍हिडिओ :अफगाणिस्तान : काबूल विमानतळावर उडत्या विमानातून तिघेजण कोसळले

Back to top button