बीजिंग : वृत्तसंस्था
आपले सरकार उलथवून टाकण्याचा प्रयत्न होऊ शकतो, याची भीती चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांना सतावत आहे. यातूनच कोरोनापेक्षाही अधिक काळजीपूर्वक पद्धतीने चिनी कम्युनिस्ट पक्षातील नेते आणि अधिकार्यांच्या विश्वासार्हतेची चाचणी ते घेत आहेत. जिनपिंग यांना शंका असलेल्या नेत्यांची यादीच त्यासाठी तयार करण्यात आली आहे.
संपूर्ण जगावर चिनी वर्चस्व लादून सुपरपॉवर बनण्याची स्वप्ने बघत असलेल्या जिनपिंग यांचे आसन आता घरातच दोलायमान झाले आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी, न्यायाधीश आणि सुरक्षा यंत्रणा फक्त त्यांनाच (जिनपिंग यांना) जबाबदार असाव्यात म्हणून त्यांनी आवश्यक ती पावले उचलली आहेत.
पक्ष आणि नेत्याशी (जिनपिंग) एकनिष्ठ नसलेल्यांचा मागोवा घेण्याची एक मोहीमच जुलैमध्ये जिनपिंग यांचे निष्ठावंत शेन यिशीन यांनी केली होती. जिनपिंग यांच्या खास गोटातील लोक अंतर्गत तसेच परराष्ट्र संबंधांमध्ये सैन्याच्या (पीएलए) हस्तक्षेपावर नाराज असल्यानेच ही मोहीम राबविली गेली होती, असे सांगण्यात येते.
चीनमध्ये सध्या अधिकार्यांविरुद्ध कारवाया वाढलेल्या आहेत. राजकारणाच्या केंद्रबिंदूकडून स्थानिक अधिकार्यांना नियंत्रित करणे आणि जिनपिंग यांच्याबद्दलची या अधिकार्यांची निष्ठा निश्चित करणे हे सगळे एकूणात गोंधळाची स्थिती निर्माण करते आहे. पक्षाच्या तळातील कार्यकर्त्यांमध्येही अस्वस्थता आहे. ज्येष्ठांना अधिक लाभ दिले जातात, हे त्यांच्या नाराजीचे एक कारणही आहे.
विरोधकांविरुद्ध मोहीम
जिनपिंग यांनी विरोधकांविरुद्धभ्रष्टाचार निर्मूलनाची मोहीमच सुरू केली आहे. कम्युनिस्ट पक्षात जिनपिंग यांच्यापूर्वी 20 वर्षांआधी जियांग युती सर्वाधिक मजबूत होती. चिनी राष्ट्राध्यक्ष जियांग जेमिन यांच्या नावाने युतीचे नामकरण होते. कम्युनिस्ट पक्षाचे एलिट सदस्य या युतीत आहेत. जिनपिंग यांच्या कायमस्वरूपी राष्ट्राध्यक्षपदाविरुद्ध ही सगळी मंडळी आहे. जिनपिंग यांनी 2012 मध्ये सत्ता काबीज केल्यापासून हे एलिट सदस्य त्यांच्या विरोधातच आहेत.
तहहयात सर्वोच्च नेतृत्वाची तजवीज
2018 मध्ये जिनपिंग यांनी राष्ट्राध्यक्षपदाची कमाल मर्यादा संपुष्टात आणली होती आणि स्वत:ला तहहयात सर्वोच्च नेता म्हणून घोषित केले होते. त्यांच्याविरुद्धच्या संभाव्य पदच्युतीलाच अशाप्रकारे पदच्युत करण्याची ही तजवीज होती. जिनपिंग यांच्या कायमस्वरूपी राष्ट्राध्यक्षपदाविरुद्ध ही सगळी मंडळी आहे. जिनपिंग यांनी 2012 मध्ये सत्ता काबीज केल्यापासून हे एलिट सदस्य त्यांच्या विरोधातच आहेत.