Mark Zuckerberg To Become Father : मार्क झुकरबर्गच्या ‘घरी कुणी तरी येणार येणार गं…’ | पुढारी

Mark Zuckerberg To Become Father : मार्क झुकरबर्गच्या ‘घरी कुणी तरी येणार येणार गं...’

पुढारी ऑनलाईन डेस्क : फेसबुकचा (Facebook) संस्थापक मार्क झुकरबर्ग (Mark Zuckerberg) याच्या घरी आणखी एक पाहुणा (Mark Zuckerberg To Become Father) येत आहे. त्यामुळे झुकरबर्गच्या घरात आनंदाचे वातावरण आहे. मार्क झुकरबर्ग या निमित्ताने तिसऱ्या अपत्याचा बाप होणार आहे. त्याने स्वतः इंस्टाग्राम पोस्टद्वारे ही माहिती दिली. झुकरबर्गने पत्नी प्रिसिला चॅनसोबतचा (Priscilla Chan) एक फोटो शेअर करून आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली आहे.

झुकेरबर्गची पत्नी प्रिसिला चॅन गरोदर असून पुढील वर्षी आपत्याला जन्म देणार आहे. या आधी तिला दोन मुले आहेत. झुकरबर्गने एका इंस्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले, “खूप प्रेम. पुढील वर्षी मॅक्स आणि ऑगस्टला बेबी सिस्टर मिळत आहे हे सांगताना खूप आनंद होत आहे !” (Mark Zuckerberg To Become Father)

झुकरबर्गच्या पोस्टला तासाभरात दोन लाखांहून अधिक लाईक्स (Mark Zuckerberg To Become Father)  

पोस्टमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये झुकरबर्ग आणि चॅन खूप आनंदी दिसत आहेत. दोघेही हसताना दिसत आहेत. फोटोमध्ये झुकेरबर्गने चॅनच्या पोटावर हात ठेवला आहे. अशाप्रकारे तो आपल्या घरी एक छोटा सदस्य येणार असल्याचे संकेत देत आहे. झुकेरबर्गच्या या पोस्टवर अभिनंदनाचा ओघ सुरू झाला आहे. त्याच्या पोस्टला तासाभरात दोन लाखांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत.

असे भेटले मार्क झुकरबर्ग आणि प्रसिला चॅन (Mark Zuckerberg To Become Father) 

मार्क झुकेरबर्ग त्याच्या काही मित्रांमार्फत प्रिसिला चॅनला पहिल्यांदा भेटला. त्यावेळी तो कॉलेजच्या दुसऱ्या वर्षाला होता. दोघांनी 2003 मध्ये एकमेकांना डेट करायला सुरुवात केली. मार्क आणि प्रसिला यांनी 19 मे 2012 रोजी लग्न केले. प्रिसिला चॅन ही वैद्यकीय विद्यार्थिनी आहे आणि ती कॅलिफोर्निया विद्यापीठ, सॅन फ्रान्सिस्कोची पदवीधर आहे.

झुकेरबर्गला दोन मुली आहेत, ज्यांची नावे मॅक्सिमा चॅन झुकरबर्ग आणि ऑगस्ट चॅन झुकरबर्ग आहेत. दोघांचा जन्म अनुक्रमे 2015 आणि 2017 मध्ये झाला होता. झुकेरबर्ग दाम्पत्य चॅन झुकरबर्ग इनिशिएटिव्ह नावाचे एक एनजीओ चालवतात. दोघांचे म्हणणे आहे की, ते या उपक्रमात फेसबुकच्या शेअर्समधील 99 टक्के मालमत्ता गुंतवतील.

झुकेरबर्ग बसली आर्थिक मंदीची झळ

मेटाचा प्रमुख झुकेरबर्गला या वर्षी जागतिक आर्थिक मंदीची झळ सोसावी लागली आहे. फोर्ब्सनुसार, 38 वर्षीय झुकरबर्ग आता जगातील श्रीमंतांच्या यादीत 22 व्या क्रमांकावर आहे. सध्या त्यांची एकूण संपत्ती ५२.३ अब्ज डॉलर आहे. 2021 मध्ये त्याने श्रीमंतांच्या यादीत तिसरे स्थान पटकावले होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Mark Zuckerberg (@zuck)


अधिक वाचा :

Back to top button