Chicago residential building blast : शिकागो येथे निवासी इमारतीत झालेल्या स्फोटात 8 जण जखमी

Chicago residential building blast : शिकागो येथे निवासी इमारतीत झालेल्या स्फोटात 8 जण जखमी

पुढारी ऑनलाइन डेस्क : Chicago residential building blast शिकागो येथे निवासी इमारतील झालेल्या स्फोटात किमान 8 जण जखमी झाले आहेत, असे अधिका-यांनी सांगितले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिकागोमधील निवासी इमारतीत मंगळवारी (स्थानिक वेळेनुसार) सकाळी 9:45 वाजता हा स्फोट झाला. त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. यासंबंधीची छायाचित्रे ट्विट करून अधिका-यांनी माहिती दिली. या छायाचित्रांमध्ये चार मजली इमारतीचा वरचा मजला स्फोटामुळे जवळजवळ पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे दिसत आहे. वॉशिंग्टन बुलेवर्ड आणि सेंट्रल एव्हेन्यूजवळ हा स्फोट झाल्याचे विभागाने सांगितले.

शिकागो अग्निशमन विभागाने ट्विटमध्ये म्हटले आहे की, "ही एक चार मजली अपार्टमेंट इमारत आहे. त्यात 35 युनिट्स आहेत. कारणाचा तपास CFD OFI कडून सुरू आहे. ATF आणि CPD द्वारे सहाय्य देण्यात येत आहे." Chicago residential building blast

Chicago residential building blast जखमींपैकी तिघांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती एबीसी न्यूजने दिली आहे. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, स्फोटाच्या ठिकाणाला लागून असलेली इमारत रिकामी करण्यात येत आहे.

डेप्युटी फायर कमिशनर मार्क फर्मन यांनी दुपारच्या ब्रीफिंग दरम्यान पत्रकारांना सांगितले की, "आम्ही सुरुवातीला तळमजला आणि तिस-या मजल्यावरील नागरिकांना बाहेर काढले. आम्हाला विश्वास आहे की इमारतीतील सर्वांना आम्ही बाहेर काढले."
घटनेत जखमी झालेल्यांमध्ये दोन महिला आणि सहा पुरुष आहेत. घटनेनंतर तात्काळ दहा रुग्णवाहिका बोलवण्यात आल्या. अहवालानुसार इमारतीचा चौथा मजला कोसळला होता," अशी माहिती अधिका-यांनी दिली.

दरम्यान, सोशल मीडियावर व्हिडिओ समोर आले आहेत, ज्यामध्ये फुटपाथ, रस्त्यावर ढिगारा पसरलेला दिसत आहे आणि इमारतीच्या बाहेर अनेक कार आणि खिडक्या उडाल्या आहेत.

CBS News नुसार अपार्टमेंट बिल्डिंगची वार्षिक तपासणी गेल्या 12 वर्षांमध्ये वारंवार अयशस्वी झाली होती आणि 2017 आणि 2018 मध्ये "दोष किंवा सेवाबाह्य स्मोक डिटेक्टर दुरुस्त करण्यात किंवा बदलण्यात अयशस्वी झाल्याबद्दल आणि सतत कार्यान्वित करण्यात अयशस्वी झाल्याबद्दल" माहिती मिळाली.

Chicago residential building blast इमारतीचा मालक म्हणाला…

इमारतीचे मालक, रोमन विरे यांनी एका निवेदनात म्हटले आहे: "ही एक दुःखद घटना आहे आणि आम्ही आमच्या सर्व रहिवाशांसाठी दुःखी आहोत. आमची पहिली चिंता आमच्या रहिवाशांचे आरोग्य आणि सुरक्षितता आहे. आम्ही आपत्कालीन सेवांना सहकार्य करण्यासाठी आम्ही सर्वकाही करू. "आणि आमच्या रहिवाशांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही जे काही करू शकतो ते करण्यास आम्ही तयार आहोत."

हे ही वाचा:

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news