डोंबिवली एमआयडीसीत हायटेन्शन वायरचा स्फोट, अनेक घरांतील विद्युत उपकरणांचे नुकसान | पुढारी

डोंबिवली एमआयडीसीत हायटेन्शन वायरचा स्फोट, अनेक घरांतील विद्युत उपकरणांचे नुकसान

डोंबिवली, पुढारी वृत्तसेवा : डोंबिवली एमआयडीसीच्या निवासी विभागातील मिलापनगरमध्ये रविवारी (दि.१८) हायटेन्शन वायरचा स्फोट झाला. महावितरणच्या हायटेन्शन वायरचा मोठा स्फोट होऊन ही वायर जळून रस्त्यावर पडली. या स्फोटानंतर परिसरातील विद्युत पुरवठा तात्काळ खंडित झाला. हा प्रकार मिलापनगरमधील प्लॉट नं.आर एल १०४ आणि १०५ बंगल्यासमोर घडला.

अचानक झालेल्या स्फोटाच्या कानठळ्या बसवणाऱ्या आवाजामुळे परिसरातील रहिवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण होते. स्फोटामुळे अनेकांच्या घरांतील विद्युत उपकरणांचे मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती कळताच महावितरणच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन हायटेन्शन वायर रस्त्यातून दूर केली.

हेही वाचलंत का?

Back to top button