बेळगाव : गॅसगळतीनंतर स्फोट; घराला आग

बेळगाव : गॅसगळतीनंतर स्फोट; घराला आग

बेळगाव; पुढारी वृत्तसेवा :  गॅसगळती होऊन आग लागून गॅसचा स्फोट झाल्याने मोठे नुकसान झाल्याची घटना करगुप्पी यल्लापूर (ता. हूक्केरी) येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीच जीवितहानी झाली नाही. घटनेची नोंद यमकनमर्डी पोलिस स्थानकात झाली आहे.

करगुप्पी यल्लापूर येथील रहिवासी अलगौडा अपरायगौडा पाटील यांच्या घरामध्ये सदर आग लागली. मंगळवार दि. 20 रोजी सकाळी घराच्या छतातून धूर येत असल्याचे काहींनी बघितले. घरातील सर्वजण बाहेर आले. कौलारु घर असल्याने आग वाढत गेली. त्यातच सिलिंडरचा स्फोट होऊन आगीचा भडका उडाला. यामुळे आसपासचे नागरिक भयभीत होऊन घरांमधून बाहेर आले. आग लागल्याचे निदर्शनास येताच नागरिकांनी पाणी मारुन आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात आली नाही.

घटनेची माहिती आग्निशामक दलाला देण्यात आली. आग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग आटोक्यात आणली. मात्र, गॅस सिलिंडरचा स्फोट झाल्याने मोठे नुकसान झाले. जीवनावश्यक वस्तू, कपडे, आदी साहित्य जळाले आहे. घटनेची माहिती मिळताच हूक्केरी तहसीलदार व गावतलाठी, ग्रा. पं. सदस्यांनी घटनास्थळी पंचनामा केला.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news