कच्च्या तेलाचे दर भडकले, पेट्रोल, डिझेल दरावर परिणाम होण्याची शक्यता | पुढारी

कच्च्या तेलाचे दर भडकले, पेट्रोल, डिझेल दरावर परिणाम होण्याची शक्यता

सिंगापूर : कमकुवत झालेला डॉलर आणि डिसेंबरमध्ये युरोपियन युनियनकडून रशियन तेलावरील घातल्या जाणाऱ्या निर्बंधापूर्वी जगभरात तेल पुरवठ्याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. यामुळे आशियाई देशांत तेलाच्या किमती सोमवारी वाढल्या. ब्रेंट क्रूड फ्युचर्स १.१५ डॉलरने म्हणजे १.३ टक्क्याने वाढून ९२.५० डॉलर प्रति बॅरलवर पोहोचले.

चीनमध्ये २१ दशलक्षाहून अधिक लोकसंख्येचे शहर असलेल्या चेंगडूमध्ये कोविड-१९ निर्बंध शिथिल केले आहेत. यामुळे जगातील दुसऱ्या क्रमांकाची तेलाची मागणी असलेल्या चीनमधील चिंता कमी झाली आहे. दरम्यान, चीनने नवीन कोटा जारी केल्यानंतर पेट्रोल आणि डिझेलच्या निर्यातीतही वाढ झाली. यामुळे तेलाचे दर भडकले असल्याचे दिसून आले आहे.

जागतिक अर्थव्यवस्थेच्या भवितव्याबद्दल प्रश्नचिन्ह असूनही कुवेत पेट्रोलियम कॉर्पोरेशन (KPC) चे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यानी रविवारी सांगितले की त्यांच्या ग्राहकांकडून तेलाची मागणी झालेली नाही. ते पूर्वीप्रमाणेच तेलाची खरेदी करत आहेत. आखाती देश असलेल्या कुवेतमध्ये सध्या त्यांच्या OPEC कोट्यानुसार दररोज २.८ दशलक्ष बॅरल तेलाचे उत्पादन घेतले जाते.

इराकच्या बसराह ऑइल टर्मिनलमधून तेल लोडिंग आणि निर्यात सामान्य दरानुसार सुरु झाली. अमेरिकेकडूनही अधिक तेल पुरवठा करण्याचे संकेत देण्यात आले आहेत. कच्च्या तेलाची मागणी वाढल्याने दर वाढत चालले आहेत. हे दर आठवड्यातील उच्चांकी स्तरावर गेले आहेत.

हे ही वाचा :

Back to top button