Queen Elizabeth II’s Funeral : एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारात सामील होणार ५०० व्हीआयपी | पुढारी

Queen Elizabeth II's Funeral : एलिझाबेथ यांच्या अंत्यसंस्कारात सामील होणार ५०० व्हीआयपी

लंडन; पुढारी ऑनलाईन : ब्रिटनच्या महाराणी एलिझाबेथ द्वितीय (Queen Elizabeth II’s Funeral) यांचे पार्थिव बंकिंगहॅम पॅलेसमधून वेस्टमिन्स्टर हॉल येथे नेले आहे. तिथेच अंत्यदर्शनाची सोय केली गेली आहे. सोमवारी त्यांच्या पार्थिवावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. यावेळी जगभरातील 500 व्हीआयपी लोक यात सहभागी होणार असल्याची माहिती आहे.

वेन्स्टमिन्स्टर अ‍ॅबे या चर्चमध्ये अंत्यसंस्कार (Queen Elizabeth II’s Funeral) होणार आहेत. या स्थळी खासगी कारऐवजी बसने जावे लागणार आहे. केवळ राष्ट्रप्रमुख आणि त्यांच्या पत्नी यांना निमंत्रण दिले गेले आहे. सर्व राष्ट्राध्यक्षांना व्यावसायिक विमानाने येण्यास सांगण्यात आले आहे. रविवारी संध्याकाळी बंकिंगहॅम पॅलेसमध्ये ब्रिटनचे नवे राजे चार्ल्स यांच्यासोबत राष्ट्राध्यक्षांना मेजवानी देण्यात येणार आहे. गेल्या 57 वर्षांनंतर प्रथमच ब्रिटनमध्ये राजकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 1965 मध्ये माजी पंतप्रधान विन्स्टन चर्चिल यांच्यावर सरकारी इतमामात अंत्यसंस्कार केले गेले होते.

रशियाला निमंत्रण नाही (Queen Elizabeth II’s Funeral)

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन, त्यांच्या पत्नी यांसह बेल्जियम, स्वीडन, नेदरलँडस्, स्पेनचे महाराज-महाराणी, फ्रान्स, ब्राझील, न्यूझीलंड, श्रीलंका, तुर्की आदी देशांचे राष्ट्राध्यक्ष येणार आहेत. रशिया, बेलारूस, म्यानमार, इराण यांना निमंत्रण देण्यात आलेले नाही. युक्रेन-रशिया युद्धामुळे रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांना बोलावण्यात आलेले नाहीच, पण चीनलाही अद्याप निमंत्रण दिले आहे की नाही, याबाबत साशंकता आहे. अलीकडच्या काळात ब्रिटनने चीनविरोधात कडक भूमिका घेतली आहे. व्यापार आणि हेरगिरीवरून दोन्ही देशांत तक्रारी आहेत.

Back to top button