Poliovirus : न्यूयॉर्कला पोलिओ व्हायरसचा वाढता धोका; आणीबाणीची केली घोषणा | पुढारी

Poliovirus : न्यूयॉर्कला पोलिओ व्हायरसचा वाढता धोका; आणीबाणीची केली घोषणा

पुढारी ऑनलाईन डेस्क : न्यूयॉर्क मध्ये पोलिओ व्हायरसच्या (Poliovirus) रूग्णांमध्ये वाढ होत असल्याने न्यूयॉर्कमध्ये आणीबाणीची घोषणा करण्यात आली आहे. शहराच्या तीन ठिकाणांच्या सांडपाण्यामध्ये पोलिओ व्हायरसचे विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे. गव्हर्नर कैथी होचुल (Cathy Hachul) यांनी याची दक्षता घेत शहरामध्ये आणिबाणी घोषित केली.

होचुल यांनी न्यूयॉर्क शहरात एक महिना आणीबाणी घोषित केली. मागच्या काही दिवसांमध्ये न्यूयॉर्क मधील उत्तरेकडील रॉकलँड या शहरामध्ये एक व्यक्ती पोलिओ या आजाराने संक्रमित झाल्याचे अढळून आले. अमेरिकेमध्ये देखील मोठ्या प्रमाणात या आजाराचे रूग्ण अढळून आले आहेत. न्यूयॉर्क मध्ये या पार्श्वभूमीवर ९ ऑक्टोबर पर्यंत ही आणीबाणी घोषीत करण्यात आली आहे. त्याचबरोबर पोलिओच्या लस घेण्यासंबंधी देखील विशेष काळजी घेण्यात येत आहे. जास्तीत जास्त लोक लस घेतील याचा प्रयत्न येथील प्रशासनाकडून करण्यात येत आहे.

रॉकलँड काउंटी, ऑरेंज काउंटी, न्यू यॉर्क सिटी, सुलिव्हन काउंटी, आणि नासाऊ काउंटी न्यायॉर्क च्या या भागात पोलिओव्हायरसचे रूग्ण अढळून आले आहे. या भागातील लोकांचं लसीकरण पूर्ण झाले आहे याकडे प्रशासनाचे विशेष लक्ष आहे. येथील आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनूसार लसीकरणाचा दर सरासरी 79% वरून 90% पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे.

हेही वाचा

Back to top button