फक्त ८ मिनिटांच्या भाषणाने बिझॉस, मस्क यांना अब्जावधींचा दणका

फक्त ८ मिनिटांच्या भाषणाने बिझॉस, मस्क यांना अब्जावधींचा दणका
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : यूएस फेडरल रिझर्व्हचे प्रमुख जेरॉम पॉवेल (Jerome Powell) यांच्या ८ मिनिटांच्या भाषामुळे जेफ बिझॉस आणि एलन मस्क या दोघांची संपत्तीत काही अब्ज रुपयांची घट झाली आहे. पॉवेल यांनी फेडरल रिझर्व्ह महागाई नियंत्रणात आणण्यासाठी व्याजदरांत वाढ करत राहील, असे स्पष्ट मत व्यक्त केल्यानंतर अमेरिकेतील शेअर बाजार कोसळला त्याच फटका अब्जाधीश आणि इतर गुंतवणुकदारांनाही झाला.

टेस्लाचे प्रमुख एलन मस्क यांच्या संपत्तीत ५.५ अब्ज डॉलरची घट झाली तर ॲमेझॉनचे मालक जेफ बिझॉस यांच्या संपत्तीत ६.८ अब्ज डॉलरची घट नोंदवण्यात आली. दोघांच्या संपत्तीतील घट तब्बल १२ अब्ज डॉलर इतक्या रुपयांची घट झाली आहे. तर बिल गेट्स आणि वॉरेन बफे यांच्या संपत्तीत अनुक्रमे २.२ अब्ज डॉलर आणि २.७ अब्ज डॉलर इतकी घट झाली आहे. Bloomberg Billionaires Index वर ही घट नोंदवण्यात आली.

पॉवेल यांच्या या ८ मिनिटांच्या भाषणानंतर डाऊ जोन्स, एस अँड पी आणि नॅसडॅक हे निर्देशांक कोसळले. या भाषणामुळे अमेरिकेतील अब्जाधिशांना ७८ अब्ज डॉलर रुपयांचा फटका बसला आहे. अमेरिकेतील महागाईत किंचित घट नोंदवल्यानंतर फेड रिझर्व्ह व्याजदरांत वाढ करण्याचे धोरण बदलेल अशी अपेक्षा होती, पण पॉवेल यांनी महागाई नियंत्रणात आणण्यासाठी काही काळ व्याजदर जास्त ठेवावे लागतील, असे जाहीर केल्याने अमेरिकेचा शेअर बाजार कोसळला.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news