श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी दिनेश गुणवर्देना यांची निवड

श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी दिनेश गुणवर्देना यांची निवड
Published on
Updated on

कोलंबो; पुढारी ऑनलाईन : श्रीलंकेच्या पंतप्रधानपदी ज्येष्ठ राजकीय नेते दिनेश गुणवर्देना यांची निवड करण्यात आली आहे. त्यांनी आज कोलंबो येथील फ्लॉवर रोडवरील पंतप्रधान कार्यालयात नवे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. रानिल विक्रमसिंघे यांनी नुकताच राष्ट्रपती पदाचा कार्यभार स्वीकारला आहे. आता दिनेश गुणवर्देना यांनी शुक्रवारी श्रीलंकेच्या पंतप्रधानपदाची सूत्रे हाती घेतली.

श्रीलंकेच्या राजकारणातील दिग्गज म्हणून गुणवर्देना यांना ओळखले जाते. यापूर्वी त्यांनी परराष्ट्र मंत्री आणि शिक्षण मंत्री म्हणून काम केले आहे. तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी एप्रिलमध्ये त्यांची गृहमंत्री म्हणून नियुक्ती केली होती.

गोटाबाया राजपक्षे यांनी देशातून पलायन केल्यानंतर ७३ वर्षीय रानिल विक्रमसिंघे यांनी गुरुवारी देशाचे आठवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. यामुळे पंतप्रधानपद रिक्त होते. आता दिनेश गुणवर्देना यांची पंतप्रधान म्हणून निवड करण्यात आली आहे.

दिनेश गुणवर्देना यांनी अमेरिकेत आणि नेदरलँड्समध्ये शिक्षण घेतले आहेत. ते ट्रेड युनियनचे नेते असून त्यांचे वडील फिलिफ गणवर्देना यांच्याप्रमाणे त्यांची लढवय्ये नेते म्हणून ओळख आहे. फिलिफ गणवर्देना यांना श्रीलंकेतील समाजवादाचे जनक म्हणून ओळखले जाते. फिलिप गुणवर्देना यांचे भारतावर विशेष प्रेम होते. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढले आहेत. ते विस्कॉन्सिन विद्यापीठात जयप्रकाश नारायण आणि व्हीके कृष्ण मेनन यांचे वर्गमित्र होते.

श्रीलंकेवरील आर्थिक संकट मोठे आहे. यामुळे येथे गेल्या काही महिन्यांपासून हिंसक निदर्शने सुरु आहेत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news