रानिल विक्रमसिंघे यांनी घेतली श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी शपथ | पुढारी

रानिल विक्रमसिंघे यांनी घेतली श्रीलंकेच्या राष्ट्रपतीपदी शपथ

कोलंबो; पुढारी ऑनलाईन : रानिल विक्रमसिंघे यांनी आज श्रीलंकेचे नवे राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या (Sri Lanka) राष्ट्रपती निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे (Ranil Wickremesinghe) यांनी विजयी मिळवला होता. श्रीलंकेतील हिंसक निदर्शनाच्या पार्श्वभूमीवर गोटाबाया राजपक्षे यांनी देश सोडून पळून गेल्यानंतर राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर २० जुलै रोजी संसदेत पार पडलेल्या राष्ट्रपती निवडणुकीत रानिल विक्रमसिंघे विजयी झाले होते. देश अत्यंत कठीण परिस्थितीत आहे. आमच्यासमोर मोठी आव्हाने आहेत, असे नवनियुक्त राष्ट्रपती रानिल विक्रमसिंघे यांनी म्हटले होते.

श्रीलंकेच्या संसदेत झालेल्या मतदानात विक्रमसिंघे यांनी प्रतिस्पर्धी दुल्लस अलाहापेरुमा यांचा १३४ विरुद्ध ८२ मतांनी पराभव केला होता. गोटाबाया राजपक्षे देश सोडून पळून गेल्यानंतर विक्रमसिंघे यांनी काळजीवाहू राष्ट्रपती म्हणून काम सांभाळले. आता त्यांची राष्ट्रपती म्हणून निवड झाली आहे. ते नोव्हेंबर २०२४ पर्यंत राष्ट्रपतीपदाचा कार्यकाळ पार पाडतील.

श्रीलंकेचे माजी राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे देश सोडून गेल्यानंतर श्रीलंकेत आणीबाणी (state of emergency)  जाहीर करण्यात आली. जोपर्यंत राष्ट्रापती गोटाबाया राजपक्षे राजीनामा देणार नाहीत, तोपर्यंत आंदोलक राष्ट्रपती भवनातच ठाण मांडून राहतील, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली होती. त्यानंतर गोटाबाया यांनी राष्ट्रपतीपदाचा राजीनामा दिला होता.

Back to top button