निपाणी : टोमॅटो, मेथी, कोथिंबीर झाली स्वस्त | पुढारी

निपाणी : टोमॅटो, मेथी, कोथिंबीर झाली स्वस्त

निपाणी; पुढारी वृत्तसेवा :  निपाणी शहराच्या आठवडी बाजारात टोमॅटोचे दर घसरले आहेत. बाजारात टोमॅटो, बीन्स, ढबू मिरची, मेथी, शेवगा यांची आवक वाढली असून भाजीपाल्याचे दर मात्र स्थिर होते.

कांदा प्रतवारीनुसार 20 ते 25 रुपये किलो, टोमॅटो 15 ते 20 रुपये किलो याप्रमाणे विक्री होत होती. लिंबू 10 रुपयांना 6 ते 10 नग, वांगी 40 ते 60, दोडका 60 ते 80, फ्लॉवर 15 ते 20 रुपये नग, कोबी 5 ते 10 रुपये गड्डा, मेथी 10 रुपये, शेपू, पोकळा, अंबाडा व पालक भाजी 10 ते 15 रुपये पेंडी अशा दराने विकली जात होती. शेवगा 10 रुपयात 3 नग , बिनिस 60 रुपये किलो, बटाटे 30 रुपये, कोथंबीर 5 ते 10 रुपये पेंडी, लसूण 40 ते 60 रुपये, भेंडी 40 रुपये किलो, ढबू मिरची 60 रुपये, हिरवी मिरची 80 ते 100 रुपये, कारली 40 ते 60 रुपये किलो याप्रमाणे दर होते.

धान्य बाजारात किराणा मालाचे प्रतिकिलो दर रुपयात पुढीलप्रमाणे:   गहू 32 ते 34 रूपये, तांदूळ 40 ते 70, बार्शी शाळू 44, तूर डाळ 120, मुगडाळ 120, मूग 100, चवळी 100, मसुरा डाळ 100, मटकी 140, हिरवा वाटाणा 80, काळा वाटाणा 80, छोले हरभरे 120, याप्रमाणे किलोचे दर होते. हरभरा डाळ 65 रुपये किलो, बेसन 80 रुपये, इडली रवा 40 रुपये, शाबू 60 रुपये, वरी 120 रुपये, पोहे 40 रुपये, शेंगदाणे 120 रुपये किलो, फुटाणे डाळ 100 रुपये किलो, भाजके पोहे 60 रुपये किलो, रवा 36, मैदा 36 रुपये किलो, साखर 38 रुपये किलो, गूळ 44 रुपये किलो, बाजारात विक्रीसाठी आलेले ग्रामीण भागातून विक्रीसाठी आलेला शाळू 28 ते 30 रुपये प्रतिकिलो,
मसाल्याचे दर तीळ 150 ते 180 रुपये किलो, जिरे 250 ते 300 रुपये, खसखस 2000, मोहरी 120, मिरी 500 ते 900, हळद पूड 200 ते 250, बदाम फुल 1200 ते 1500, खोबरे 160 ते 180, धने 160 रुपये किलो, फॉर्च्यून 15 किलो डब्बा 2850 रुपये तर सोयाबीनचा सिद्धी डबा 2250 रुपये, पाम तेल एक लिटर चे पाकिट 140 रुपये

फळ बाजारात फणस व अननसाची आवक वाढली आहे.तोतापुरी आंबे 150 ते 200 रुपये डझन, सफरचंद 180 ते 220 रुपये किलो, मोसंबी 60 ते 80 रुपये किलो, पेरू 80 ते 100 रुपये किलो, डाळिंब 60 ते 100 , पपई 20 ते 30 रुपये नग, वसई केळी 60 ते 70 रुपये तर जवारी केळी 40 ते 60 रुपये डझन, अननस 30 ते 50 रुपये नग, ओला खजूर 120 रुपये किलो याप्रमाणे विक्री होत
होती.

अंडी 52 रुपये डझन, चिकन 240 ते 260 रुपये किलो, मटन 600 ते 640 रुपये किलो, मच्छी मंडईत नदी व तलावाच्या माशांची आवक वाढली आहे. नदीचे मासे 200 ते 400 रुपये किलो याप्रमाणे विक्री होत होते.

Back to top button