एलन मस्क यांनी ट्विटर खरेदीचा करार केला रद्द, ट्विटर कायदेशीर कारवाईच्या तयारीत

एलन मस्क यांनी ट्विटर खरेदीचा करार केला रद्द, ट्विटर कायदेशीर कारवाईच्या तयारीत
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : बनावट खात्यांबाबत माहिती देण्यात ट्विटर अपयशी ठरल्याने जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी अखेर ट्विटर विकत घेण्याचा करार रद्द केला. ४४ अब्ज डॉलर्समध्ये मस्क ही मायक्रो ब्लॉगिंग साइट विकत घेणार होते. मस्क यांच्या या घोषणेनंतर ट्विटरचे शेअर्स 7 टक्क्यांनी घसरले असून ट्विटर मस्क यांच्याविरोधात खटला दाखल करणार आहे.

एलन मस्क यांच्या वकिलांनी एका याचिकेत म्हटले आहे की, वारंवार विनंती करूनही ट्विटर कंपनीच्या व्यावसायिक कामगिरीसाठी आवश्यक असलेल्या बनावट किंवा स्पॅम खात्यांबद्दल माहिती देण्यास नकार दिला. तसेच ट्विटरवर कराराचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे. ट्विटरने खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिली असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कंपनी आपल्या प्लॅटफॉर्मवर उपस्थित असलेल्या बनावट खात्यांशी संबंधित डेटा प्रदान करण्यात अपयशी ठरल्याचे मस्क यांनीही म्हटले आहे.

एलाॅन मस्क आणि ट्विटर इंक यांच्यामध्ये ४४ अब्ज अमेरिकन डाॅलर्सला व्यवहार झाला होता.  एलाॅन मस्क यांनी ट्विटर इंकमध्ये ५४.२० डाॅलर रोखीमध्ये प्रति शेअर विकत घेतला होता. ट्विटर इंकनेही मस्क यांची ही ऑफर स्वीकारली. पण ट्वीटरची खरेदी केल्यानंतर सर्व काही सुरळीत पार पडण्या ऐवजी त्यांच्या अडचणीत अधिकच वाढ झाली होती. ट्वीटर खरेदीनंतर टेस्लाचे शेअर्स मोठ्या प्रमाणावर घसरल्याने मस्क यांना मोठे नुकसान सोसावे लागले होते. ट्वीटर खरेदी रोखण्यासाठी अनेकांकडून प्रयत्न केले जात होते. फ्लोरिडा पेंशन फंड यांनी डेलावेअर चान्सरी न्यायालयात ट्वीटरची खरेदी रोखण्यासाठी एलन मस्क आणि ट्वीटर विरोधात याचिका देखील दाखल केली होती.

ट्विटर मस्क यांच्याविरोधात खटला दाखल करणार

मस्क यांच्या घोषणेनंतर ट्विटर त्यांच्याविरोधात खटला दाखल करणार आहे. ट्विटर बोर्ड मस्क यांच्याविरोधात कारवाई करणार असल्याचे ट्विटरचे अध्यक्ष ब्रेट टायलो यांनी सांगितले. कंपनीला विलीनीकरण पूर्ण करायचे आहे आणि ते पूर्ण करण्यासाठी न्यायालयात जाण्याची तयारी केली जात असल्याचे ट्विटरकडून सांगण्यात आले आहे.

हेही वाचलंत का?

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news