अमेरिकेत अंधाधुंद गोळीबार; सहा ठार, २५ हून अधिक गंभीर जखमी | पुढारी

अमेरिकेत अंधाधुंद गोळीबार; सहा ठार, २५ हून अधिक गंभीर जखमी

पुढारी ऑनलाईन : अमेरिकेतील शिकागो शहरातील हायलँड पार्क येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त सुरू असलेल्या परेड दरम्यान अचानक गोळीबार झाला. या अंधाधुंद गोळीबारात सहा जणांचा मृत्यू झाला असून, २५ हून अधिक लोक गंभीर जखमी झाले आहेत. यामध्ये अनेक लहान मुलांचा समावेश आहे. जखमींवर उपचार सुरू असून, काहींची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी एका तरुणाला ताब्यात घेण्‍यात आले आहे.

स्थानिक वृत्तानुसार, बंदुकधारी व्यक्तीने दुकानाच्या छतावरून परेडमधील सहभागींवर गोळीबार केला. या घटनेत पोलिसांनी सोमवारी एका संशयिताला अटक केली आहे. रॉबर्ट क्रेमो असे या संशयिताचे नाव असून, तो २२ वर्षांचा आहे. हायलँड पार्क, इलिनॉय या शहरात शोध घेतल्यानंतर संशयिताला पोलीसांकडून ताब्यात घेण्यात आले आहे. यापूर्वी क्रेमो हा पोलीस कोठडीत होता, असे सांगण्यात आले होते. तसेच तो सशस्त्र आणि अत्यंत धोकादायक असल्याचा इशाराही पोलिसांनी दिला होता.

अमेरिकेतील शिकागो येथे सोमवारी परेडमध्ये अचानक गोळीबार सुरू झाला. फायरिंग सुरू होताच, लोक सैरभैर होउन धावू लागले. या फायरिंगचे कारण अद्याप समोर आलेले नाही. गोळीबाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत, या ठिकाणापासून लांब राहण्याचे आदेश येथील प्रशासनाने दिले आहेत. यापूर्वी अशाचप्रकारे अमेरिकेत गोळीबार झाल्याची घटना घडली होती. एका संशियत तरूणाला ताब्यात घेतले असून, पोलीस प्रशासन सतर्क होत, अधिकचा तपास करत आहे.

हेही वाचा:

Back to top button