जॉनी डेपने पत्नीविरुद्धचा खटला जिंकला, तब्बल ११६ कोटी नुकसान भरपाई मिळणार | पुढारी

जॉनी डेपने पत्नीविरुद्धचा खटला जिंकला, तब्बल ११६ कोटी नुकसान भरपाई मिळणार

पुढारी ऑनलाईन डेस्क : जगभर सेलिब्रेटी खटला म्हणून चर्चेत असणारा हॉलिवूड अभिनेता जॉनी डेप आणि त्याची पूर्व पत्नी अंबर हर्ड यांच्यातील खटला जॉनी डेपने जिंकला आहे. पत्नीकडून नुकसानभरपाई म्हणून जॉनीला ११६ कोटी रुपये मिळणार आहेत.

जॉनी विरुद्ध त्याची पूर्व पत्नी अंबरने लैंगिक अत्याचाराचे आरोप लावले होते. ज्यामुळे जॉनीच्या हॉलिवूड करिअरवर मोठा परिणाम झाला होता. ज्युरींनी अंबरच्या लैंगिक अत्याचारांमध्ये काहीही तथ्य नसल्याचे सांगितले आहे. दरम्यान, जॉनीने अंबरवरती ५० मिलियन डॉलर्सचा मानहानीचा दावा दाखल केला होता. या दाव्याचा निकाल जॉनीच्या बाजूने देताना १५ मिलियन डॉलर्स म्हणजेच जवळपास ११६ कोटी रुपये अंबरला द्यावा लागणार आहे. यातील १० मिलियन ही नुकसानभरपाई म्हणून तरी ५ मिलियन ही दंडाच्या स्वरुपात आहे.

त्याने माझ्या गुप्तांगात दारूची बाटली घातली; अभिनेत्रीचा पतीवर भर न्यायालयात गंभीर आरोप

‘पायरट्स ऑफ कॅरिबिअन’ने जगप्रसिद्ध असलेल्या जॉनी डेप यांचे अंबर यांच्याशी २०१५ मध्ये लग्न झाले होते. यानंतर लगेचच म्हणजे १५ महिन्यातच ते दोघे वेगळे झाले होते. यावेळी जॉनीने अंबरला ७० लाख डॉलर्स दिले होते. २०१६ आणि २०१८ मध्ये अंबरने जॉनीवर लैंगिक अत्याचाराचे आणि कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप केले होते.

अमिताभ बच्चन वेब सीरिजमध्ये झळकणार!

Back to top button